bjp survey of mla | Sarkarnama

भाजपचे न झालेले सर्व्हेक्षण ! 

कानोजी
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

जे न देखे रवी, ते देखे कवी, असे म्हणतात. त्याच धर्तीवर न घेतलेल्या परीक्षेत भाजपचे 40 टक्‍के आमदार नापास झाले असल्याची चर्चा रंगली आहे. आमदार आणि खासदारांच्या मतदारसंघातले वातावरण, तेथील समीकरणे यांचा अभ्यास जुलै, ऑगस्टच्या आधीच भाजपने केला होता. आंदोलने तीव्रपणे सुरू होती, तरीही राज्यातल्या समारे 155 मतदारसंघांत भाजपची कामगिरी समाधानकारक असल्याचा अहवाल सर्वेक्षणातून समोर आला होता. 

स्थानिक आमदारांच्या मतदारसंघांतले विषय काय याचा गोषवाराही या सर्वेक्षणाने दिला होता. भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अहवालाचा मतदारसंघनिहाय तपशील त्या त्या आमदाराला सोपवला. महाराष्ट्रातील 40 टक्‍के आमदारांची कामगिरी चांगली नसल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणातून समोर आल्याच्या बातम्या पसरल्या. आमदार किंवा खासदारांची कामगिरी कशी आहे, असा प्रश्‍न या सर्वेक्षणात नव्हताच; त्यामुळे यासंबंधीच्या कपोलकल्पित बातम्या पसरू लागल्या. 

वैतागलेल्या भाजपने या बातम्या खऱ्या नाहीत, असे ट्विटर हॅंडलवर टाकले. पत्रकारांवर तसाही भाजपचा राग. त्यामुळे असत्य छापले जात असल्याच्या तक्रारी केल्या गेल्या. चाणक्‍य या राष्ट्रीय स्तरावरील पाहणी संस्थेकडून ही माहिती मिळवली गेली, असे म्हणतात. पण तेही खरे नाही, असे आता सांगितले जावू लागले.

रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे नाराज झालेल्या काही नाराजांनी या बातम्या पसरवल्या, असे सांगितले जात आहे. शपथविधी तर नाहीच, शिवाय 40 टक्‍के आमदारांना तिकिटे दिली जाणार नाहीत या वार्तेमुळे आमदार कमालीचे धास्तावले आहेत म्हणे. अर्थात भाजपने आता मात्र सर्वेक्षण सुरू केले आहे, यात आमदार, खासदारांची कामगिरी जोखली जाणार आहे. खरे-खोटे भाजपच जाणे. 

संबंधित लेख