पनवेल मधे भाजप तटकरेंच्या सोबत? आमदार प्रशांत ठाकुर यांचा प्रतिक्रियेला नकार

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी दरम्यान पनवेल मधील भाजपचे आमदार आणि नगरसेवक उघडपणे राष्ट्रवादीचे आमदार सुनील तटकरेंच्या सोबत असल्याचे पाहायला मिळाल्याने शिवसेनेच्या उमेदवाराकरता हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. पनवेल मधे भाजपचे 54 नगरसेवक निवडून आले असुन, पनवेल उरणमधील भाजपची मते आपल्या कडे वळविण्यात तटकरेंना यश अाल्याचे मानले जात असून,अ से घडल्यास अनिकेत तटकरेंचा विजय निश्चित मानला जात आहे.
पनवेल मधे भाजप तटकरेंच्या सोबत? आमदार प्रशांत ठाकुर यांचा प्रतिक्रियेला नकार

पनवेल : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी दरम्यान पनवेल मधील भाजपचे आमदार आणि नगरसेवक उघडपणे राष्ट्रवादीचे आमदार सुनील तटकरेंच्या सोबत असल्याचे पाहायला मिळाल्याने शिवसेनेच्या उमेदवाराकरता हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. पनवेल मधे भाजपचे 54 नगरसेवक निवडून आले असुन, पनवेल उरणमधील भाजपची मते आपल्या कडे वळविण्यात तटकरेंना यश अाल्याचे मानले जात असून,अ से घडल्यास अनिकेत तटकरेंचा विजय निश्चित मानला जात आहे. 

या बाबत आमदार प्रशांत ठाकुर यांच्याशी संपर्क साधला असता ठाकुर यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेच्या निवडणुकांचे मतदान सोमवार (ता.21) पार पडले असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरेंचे सुपुत्र अनिकेत तटकरे निवडणुक लढवत आहेत. तर सेनेकडून राजीव साबळे हे उमेदवार आहेत.

रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ९४१ मतदारांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क आहे. शिवसेना व भाजप यांची कोकणात एकूण ४२२ सदस्य संख्या आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, स्वाभिमान पक्ष व मनसे यांची एकूण मतांची संख्या ४१२ आहे. तर अपक्ष सदस्य २३ असून ही मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. 

राज्यात भाजपा-सेना एकत्र असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने सेनेला हा मोठा झटका मानला जात आहे. पालघर लोकसभा निवडणुकीत सेनेने वनगा कुटुंबीयांचा पक्ष प्रवेश करून त्यांच्या मुलाला उमेदवारी दिल्याने भाजपामध्ये नाराजी पसरली होती. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेत सेना-भाजप यांची अघोषित युती झाली होती. मात्र, शेवटच्या क्षणी भाजपाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने सेनेला मोठा झटका बसला आहे.

दोन्ही पक्षांच्या मतांची संख्या पाहता पनवेलमधील मतांच्या जोरावर विधानपरीषदेची निवडणुक जिंकणे सहज शंक्य असल्याचे गणीत तटकरेंना माहीती असल्याने निवडणुकीच्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे पनवेलमध्येच तळ ठोकून होते. पनवेल उरणमध्ये सर्व पक्षांचे मिळुण एकूण ११८ मतदार असून, सेना वगळता उर्वरीत सर्व मते राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. 

माध्यमांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रीया देवु नये असे निर्देश आहेत. म्हणून या विषयी बोलणार नाही. मतदान केंद्रावर गेलो असता तटकरेही तिथेच उपस्थित असल्याने दोघांची भेट झाली - 
प्रशांत ठाकुर, आमदार, पनवेल.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com