भाजप पुरस्कृत जिल्हा परिषद अध्यक्षाच्या हाती राष्ट्रवादीचा झेंडा

माढा लोकसभा मतदार संघातून अखेर राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादीच्या बळावर आणि भाजपच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पदरात पाडून घेणारे मोहिते विरोधक संजय शिंदे यांनी आज माढा तालुक्यातील निमगाव येथे आमदार बबन शिंदे याच्या निवासस्थानी पवार यांचे स्वागत केले. यावरूनच संजय शिंदे यांनी शरद पवारांच्या विजयासाठी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजप पुरस्कृत जिल्हा परिषद अध्यक्षाच्या हाती राष्ट्रवादीचा झेंडा

पंढरपूर :  माढा लोकसभा मतदार संघातून अखेर राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब  झाले  आहे. राष्ट्रवादीच्या बळावर आणि भाजपच्या पाठिंब्यावर  जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पदरात पाडून घेणारे मोहिते विरोधक संजय शिंदे यांनी आज माढा तालुक्यातील निमगाव येथे आमदार बबन शिंदे याच्या निवासस्थानी  पवार यांचे स्वागत केले. यावरूनच संजय शिंदे यांनी शरद पवारांच्या विजयासाठी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

मागील पाच वर्षापासून संजय शिंदे यांचे भाजपशी चांगले चे संबंध आहेत. भाजपाच्या पाठिंब्यावरच त्यांनी राष्ट्रवादीकडे बहुमत असतानाही जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवले. लोकसभा निवडणूकीसाठी पुन्हा विजयसिंह मोहिते यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर शिंदे विरोधी सूर आळवत थेट राष्ट्रवादीलाच आव्हान दिले होते. राष्ट्रीय राजकारणात पवारांचे महत्व वाढल्याने हक्काची जागा जाऊ नये, यासाठी खुद्द पवारांनीच माढयातून निर्णय जाहीर केला आहे.

पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी पासून दुरावलेल्या संजय शिंदे यांची कोणता झेंडा घेऊ हाती अवस्था झाली होती. मात्र आज संजय शिंदे यांनी आपल्या निमगाव येथील निवासस्थानी स्वागत करून आशिर्वाद घेतले. एकूणच आज पवार यांच्या दौऱ्यातील गाठीभेटी आणि आमदार बबन शिंदे निवासस्थानी झालेल्या स्नेह भोजना नंतर भाजप पुरस्कृत जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी पुन्हा शरद पवारांच्या विजयासाठी राष्ट्रवादीचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतल्याचे आज स्पष्ट झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com