bjp sp alliance | Sarkarnama

भाजप- सपाचा नवा दोस्ताना ! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

 गोवंश हत्याबंदीचा मुद्दा ऐरणीवर असताना आज पालिकेच्या स्थायी समितीत गोशाळांची काळजी घेण्यासाठी भाजपच्या मदतीला सपा सरसावली आहे. मानखुर्द शिवाजी नगर येथे गोशाळा उभारण्यासाठी मोकळ्या जागा असून या ठिकाणी गोशाळा बांधल्यास आम्ही गायींची काळजी घेवू, अशी भुमिका सपाचे गटनेते रईस शेख यांनी घेतल्यामुळे स्थायी समितीत भाजप आणि सपाचा नवा दोस्ताना निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. 

मुंबई : गोवंश हत्याबंदीचा मुद्दा ऐरणीवर असताना आज पालिकेच्या स्थायी समितीत गोशाळांची काळजी घेण्यासाठी भाजपच्या मदतीला सपा सरसावली आहे. मानखुर्द शिवाजी नगर येथे गोशाळा उभारण्यासाठी मोकळ्या जागा असून या ठिकाणी गोशाळा बांधल्यास आम्ही गायींची काळजी घेवू, अशी भुमिका सपाचे गटनेते रईस शेख यांनी घेतल्यामुळे स्थायी समितीत भाजप आणि सपाचा नवा दोस्ताना निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. 

मुंबईतील रहदारीला बेवारस आणि भटकी जनावरे यांचा अडथळा येत आहे. त्यामुळे त्यांना पकडून कोंडवाड्यात आणण्यासाठी कॅटल इम्पाउंडिंग वाहने पुरविण्याचा प्रस्ताव आज स्थायी समितीत मंजूर झाला. या वाहनांची सेवा आवश्‍यक स्वरूपाची असल्याने मे साज इंटरप्रायझेस यांना हे कंत्राट देण्यात आले आहे. 1 कोटी 21 लाख रुपयांच्या या प्रस्तावाला समितीने मंजूरी दिली. भटकी जनावरे फुटपाथवर तसेच रस्त्यांवर ठाण मांडून बसतात. त्यामुळे वाहतूकीला मोठा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे बेवारस आणि भटकी 
जनावरे पकडून त्यांना कोंडवाड्यात आणण्यासाठी या वाहनानांची गरज असल्याचे मत सर्वच राजकीय पक्षाच्या सदस्यांनी व्यक्त केले. भटकी जनावरे पकडल्यास अस्वच्छताही होणार नाही असे मत सदस्यांनी मांडले. अनेक फुटपाथ फेरीवाल्यानंतर आता गायींना व्यापले आहेत. त्यामुळे लोकांना फुटपाथवर चालणे अवघड होत आहे. अनेक ठिकणी गाई भाड्याने आणून रस्त्यावर, फुटपाथवर किंवा देवळांच्या बाहेर बांधून त्यावर उपजीविका केली जाते. तेथे हिंदू धर्मियांकडून चारा-पाणी दिले जाते. हे रोखण्यासाठी मुंबईत गोशाळेची आवश्‍यकता असल्याचे भाजपा कडून सांगण्यात आले. भाजपला सपाचे गटनेते शेख यांनी पाठिंबा दिला. शिवाजी नगर मानखूर्द या भागात गोशाळा उभारल्यास आम्ही गायींची देखभाल करू अशी भुमिका मांडत भाजपला त्यांनी पाठिबा दिला. आम्ही गायींची काळजी घेवू , देखभाल करू असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पालिकेत भाजप आणि सपाची नवी युती पालिकेत तयार झाल्याचे चित्र दिसले. 

संबंधित लेख