Bjp shows carrot to party workers on education committee | Sarkarnama

भाजप कार्यकर्त्यांना दाखविलेल्या शिक्षण समितीच्या गाजराची पुंगी वाजेना!

उमेश घोंगडे
गुरुवार, 8 मार्च 2018

पुणे : पुणे महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त करून त्याऐवजी महापालिकेअंतर्गत शिक्षण समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. मात्र महापालिकेत सत्तेत आल्यानंतर एक वर्ष होऊनही या संदर्भातील निर्णय अद्याप झालेला नाही. निवडणुकीनंतर अनेक कार्यकर्त्यांना दाखविण्यासाठी मोठे गाजर ठरलेली शिक्षण समिती वर्षानंतरही प्रत्यक्षात न आल्याने कार्यकर्त्यांची वर्णी हा बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी ठरली आहे. 

भारतीय जनता पक्ष सत्तेत येऊन या महिन्यात एक वर्ष झाले. सत्तेत आल्यानंतर तातडीने शिक्षण मंडळाविषयी निर्णय घेण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत स्वतंत्र शिक्षण मंडळ असणार नाही, असा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने जाहीर केला.

शिक्षण मंडळातील गाजलेले भ्रष्टाचाराचे घोटाळे हे शिक्षण मंडळाऐवजी शिक्षण समिती स्थापन करण्याचे महत्वाचे कारण मानले जाते. पर्यायी शिक्षण समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. मात्र या समितीचे स्वरूप आणि नियुक्‍त्यांची प्रक्रिया ठरविण्याचा घोळ गेले वर्षभर सुरू आहे. समितीची सदस्यसंख्या किती असावी, नगरसेवक, शिक्षणक्षेत्रातील तज्ञ यांची संख्या किती असावी, हा घोळ अद्याप संपलेला नाही.

त्यामुळे काही डझन कार्यकर्ते राज्य सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत. यातील काहीजण पालकमंत्री बापट यांच्याकडे पाठपुरावादेखील करीत आहेत. मात्र कॅबिनेटपुढे प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. निर्णय लवकरच होईल, असे त्यांना सांगण्यात येत आहे. वास्तविक कार्यकर्त्यांच्या दृष्टीने इतका महत्वाचा निर्णय घेण्यास राज्य सरकार वेळखाऊ भूमिका घेत असल्याने पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्तेदेखील नाराज आहेत.  या समितीवर घेण्याचे आश्वासन भाजपने अनेक जणांना दिले आहे. इतर पक्षांतील बड्या कार्य़कर्त्याला भाजपमध्ये घेताना हेच लाॅलिपाॅप दाखविण्यात आले होते. मात्र या कार्यकर्त्यांनीही आता हा नाद सोडून दिला आहे.

संबंधित लेख