bjp shivsena understanding | Sarkarnama

शिवसेनेच्या आमदाराचे भाजपच्या राज्य मंत्र्यांकडून कौतुक, ही नांदी युतीची काय ?

शर्मिला वाळुंज
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

ठाणे : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपाची युती होणार नाही असे सुतोवाच एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख करीत आहेत. तर दुसरीकडे डोंबिवलीत मात्र भाजपचे राज्यमंत्री सेनेच्या आमदारांचे कोडकौतुक करत असल्याने ही युतीची नांदी तर नाही...अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. भाजपाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतील एका उद्यानाची नुकतीच पहाणी केली. या उद्यानाचे सुशोभीकरण शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी केले असून राज्यमंत्र्यांनी या कामाचे कौतुक केल्याचा फोटो व संदेश समाज माध्यमावर फिरत आहे.

ठाणे : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपाची युती होणार नाही असे सुतोवाच एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख करीत आहेत. तर दुसरीकडे डोंबिवलीत मात्र भाजपचे राज्यमंत्री सेनेच्या आमदारांचे कोडकौतुक करत असल्याने ही युतीची नांदी तर नाही...अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. भाजपाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतील एका उद्यानाची नुकतीच पहाणी केली. या उद्यानाचे सुशोभीकरण शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी केले असून राज्यमंत्र्यांनी या कामाचे कौतुक केल्याचा फोटो व संदेश समाज माध्यमावर फिरत आहे. येत्या निवडणुकांत युती होणार की नाही यावर वाद सुरु असताना भाजपाचे राज्यमंत्री मात्र शिवसेनेच्या आमदारांचे कौतुक करत असल्याने युतीची ही नांदी असल्याची चर्चा एकावयास मिळत आहे. 

2019 मध्ये लोकसभा, विधानसभा निवडणूका होणार असल्याने दोन्ही पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. सण उत्सवांमध्ये मंडळांना भेटी देणे, कार्यकर्त्यांच्या घरी जाण्यास बड्या नेत्यांनी सुरुवात केली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या कामांची पहाणीही सुरु केली आहे. यासोबतच विभागाविभागातील कामकाजाचा व परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. डोंबिवलीतील सुनिलनगर येथील बहिणाबाई उद्यानाचे स्थानिक नगरसेविका अलका म्हात्रे यांच्या प्रयत्नातून आमदारनिधीतून सुशोभिकरण करण्यात आले आहे. उद्यानात बहिणाबाई यांच्या कविताही लावण्यात आल्या असून नागरिकांना बहिणाबाईंच्या ओव्या, कविता येथे वाचता येईल. राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी नुकतीच या उद्यानाची पहाणी केली यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक पप्पू म्हात्रे हे उपस्थित होते. चव्हाण यांनी उद्यानाची पहाणी करत कामाचे कौतुक केले. याविषयीचा संदेश समाज माध्यमावर सध्या फिरत आहे. 

भाजपाच्या राज्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या आमदारांचे कौतुक करणे म्हणजे ही युतीची नांदी आहे अशी चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. एकीकडे पक्षातील बडे नेते युती होणार नसल्याचा दावा करीत आहेत, परंतू दुसरीकडे एकमेकांच्या कामांचे मात्र कोडकौतुक सुरु असल्याने युती होणार असा विश्वास पक्षातील जुनेजाणते कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. 

श्रेयासाठीही लढाई 
स्थानिक नगरसेविका अलका म्हात्रे या भाजपाच्या नगरसेविका आहेत. त्यामुळे या कामाचे श्रेय पूर्णतः भाजपला जाऊ नये म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आधीच फोटो व्हायरल करीत हे काम शिवसेना आमदार भोईर यांच्या आमदार निधीतून झाले असल्याचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. 
 

संबंधित लेख