bjp-shivsena, baramati | Sarkarnama

  भाजपकडून शिवसेनेला स्वापत्नभावाची वागणूक : शिवतारे 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 9 जुलै 2017

बारामती ः राज्यातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यातील बॅंका शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक दहा हजारांचे अनुदान नाकारत आहेत, याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व बॅंकांच्या शाखांपुढे "ढोल बजाओ' आंदोलन सोमवारी (ता. 10) केले जाणार आहे. तसेच शिवसेनेला भाजप सापत्नभावाची वागणूक देते असा थेट आरोप जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज बारामतीत केला. 

""कर्जमुक्तीसाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे, शेतकऱ्यांना पेरणीसाठी दहा हजारांचे अनुदान जिल्हा बॅंकांनी द्यावे, अशा सूचना सरकारने केल्या असून त्याला हमीही दिली आहे. मात्र, कॉंग्रेस व राष्ट्रवादी यातही राजकारण आणून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम करत आहेत. याचा आणि प्रत्येक शाखेतील शेतकरी व त्यांच्या कर्जाचीही माहिती शिवसेनेचे कार्यकर्ते गोळा करून शिवसेना पक्षप्रमुखांना पाठवतील. शेतकऱ्यांना हे अनुदान तातडीने मिळून त्यांना पेरणीसाठी दहा हजारांची मदत व्हावी, असा उद्देश या आंदोलनामागे आहे,'' असे शिवतारे यांनी सांगितले. 

शिवसेनेवर अजित पवार यांनी केलेल्या टीकेसंदर्भात विचारले असता, ""शिवसेना गांडूळ असेल तर महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचा अजगर कोण आहे, याची राज्याला माहिती आहे. अजित पवार यांच्याकडे आता बोलण्यासारखे फार काही नाही. त्यांच्याकडे आम्ही फार लक्षही देत नाही,'' असे शिवतारे म्हणाले. 
शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अँड. राजेंद्र काळे या प्रसंगी उपस्थित होते. 

जनहितासाठीच सरकारसोबत 
""भाजप सापत्नभावाची वागणूक देते, ही बाब वेळोवेळी दिसूनही केवळ या राज्यातील जनतेने भाजप-शिवसेनेला जो कौल दिला, त्या जनमताचा आदर करण्यासाठी व कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात राज्य जाऊ नये, म्हणून आम्ही सरकारसोबत आहोत,'' असे शिवतारे यांनी सांगितले. 
शिवसेनेचा उल्लेख त्यांनी "सरकारचा टेकू' असा उल्लेख केला. शिवसेनेला भाजप कोणत्याच बाबतीत विश्‍वासात घेत नाही, राज्यमंत्री म्हणून आपण हतबल आहात का? असे विचारता, ""आम्ही हतबल नाही, पण अनेक बाबतीत सेनेला सापत्नभावाची वागणूक मिळते, ही वस्तुस्थिती आहे,'' असे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले. 

संबंधित लेख