bjp shiv sena | Sarkarnama

औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप नगरसेवक अडचणीत 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 18 मे 2017

औरंगाबाद :  महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना-भाजप नगरसेवकांना सध्या बुरे दिवस आले आहेत की काय? अशी शंका यावी असे प्रकार त्यांच्या बाबतीत घडतांना दिसत आहेत. शिवसेनेचे नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरात इंजिनिअरिंगचा पेपर पुन्हा सोडविणाऱ्या 26 विद्यार्थ्यांना अटक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. तर हर्सूल वॉर्डाचे भाजप नगरसेवक पूनमचंद बमणे यांच्या सांवगीजवळील पूनम ढाब्यावर छापा टाकत पोलिसांनी अवैधरित्या विकल्या जाणाऱ्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या होत्या. 

महापालिकेमध्ये सत्तेत असूनही शिवसेना-भाजप या दोन पक्षांमध्ये फारसे सख्य नाही. एकमेकांवर कुरघोडी व टीका करण्याची एकही संधी हे दोन्ही पक्ष सोडत नाहीत. महापालिकेतील कारभारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने अनेक बंधने लादल्यामुळे नगरसेवकांची गोची झाली आहे. एवन आणि विना निविदांची किरकोळ कामे देखील बंद झाल्याने नगरसेवकांना महापालिकेतील राजकारणात फारसा रस राहिलेला नाही. त्यामुळे अनेक नगरसेवकांनी साईड बिझनेसचा आधार घेतला आहे. अनेकांचे हॉटेल, ढाबे, प्लॉटिंग, गुत्तेदारीचे व्यवसाय आहेत. भाजपचे हर्सूल वॉर्डाचे नगरसेवक पुनमचंद बमणे यांचा हर्सूल सांवगी रोडवर बियरबार होता. सर्वोच्च न्यायालयाच्या 500 मीटर नियमामुळे तो बंद पडला आहे. सध्या या ठिकाणी ढाब्याच्या नावाखाली चोरून दारू विकली जात असल्याचा पोलिसांना संशय होता. त्या आधारे फुलंब्री पोलिस 
ठाण्याच्या पथकाने काल रात्री "पूनम' हॉटेलवर छापा मारून देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. त्यामुळे पारदर्शक भाजप अडचणीत आली आहे. 
सुरेमुळे शिवसेना अडचणीत 
शिवसेनेचे सुरेवाडी वॉर्डाचे नगरसेवक इंजिनिअरिंगच्या पेपर प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. मंगळवारी बी.ई. सिव्हिल तृतीय वर्षाचा सिव्हिल कन्स्ट्रक्‍शन अँन्ड ड्रॉईंगचा पेपर बुधवारी सुरे यांच्या घरात 26 विद्यार्थी लिहितांना सापडले. गुन्हेशाखेच्या पोलिसांनी धाड टाकली तेव्हा काही प्राध्यापक देखील या ठिकाणी हजर होते. पोलिसांनी या सगळ्यानाच ताब्यात घेतल्यावर नगरसेवक सुरे यांना देखील ताब्यात घेतले. नेमका या प्रकरणाशी सुरे यांचा काय संबंध होता हे पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान या प्रकरणामुळे शिवसेना देखील अडचणीत आली आहे. 
 
संबंधित लेख