bjp to senf big leaders in baramati | Sarkarnama

भाजपचे दिग्गज नेते बारामतीत : शहा, गडकरी, आदित्यनाथ, स्मृती इराणी किल्ला लढविणार

मिलिंद संगई
सोमवार, 15 एप्रिल 2019

बारामती शहर : भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बारामती लोकसभा मतदारसंघावर शेवटच्या टप्प्यात सर्जिकल स्ट्राइकचा निर्णय घेतला आहे. एकीकडे राष्ट्रीय स्तरावरील; तर दुसरीकडे राज्यस्तरावरील नेत्यांच्या सभा आयोजित करून मतदारसंघात वातावरणनिर्मिती करण्याचा भाजपचा जोरदार प्रयत्न आहे.
 

बारामती शहर : भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बारामती लोकसभा मतदारसंघावर शेवटच्या टप्प्यात सर्जिकल स्ट्राइकचा निर्णय घेतला आहे. एकीकडे राष्ट्रीय स्तरावरील; तर दुसरीकडे राज्यस्तरावरील नेत्यांच्या सभा आयोजित करून मतदारसंघात वातावरणनिर्मिती करण्याचा भाजपचा जोरदार प्रयत्न आहे.
 
कोणत्याही परिस्थितीत बारामतीची जागा खेचून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न भाजपकडून सुरू असून, 19 एप्रिलला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा; तर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 21 एप्रिलला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा मतदारसंघात होणार आहे. तसेच, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही सभा बारामती लोकसभा मतदारसंघात घेण्याचे निश्‍चित झाले आहे. भाजपचे वासुदेव काळे यांनी याबाबत माहिती दिली. 

बारामतीच्या शारदा प्रांगणात 19 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता अमित शहा सभा घेणार आहेत. 21 एप्रिल रोजी नितीन गडकरी बारामती लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. बारामती शहर किंवा सासवडमध्ये त्यांची सभा होणार आहे. याबाबत दोन दिवसात स्थळ निश्‍चिती होईल. स्मृती इराणी यांची 21 एप्रिल रोजी हिंजवडी परिसरात सभा होणार आहे. त्यांच्या दोन सभा याच परिसरात करण्याचे भाजपचे नियोजन आहे. दुसऱ्या सभेचे ठिकाण ठरविण्याचे काम सुरू आहे. योगी आदित्यनाथ यांची सभा 19 एप्रिल रोजी खडकवासला येथे होणार आहे, असे काळे यांनी सांगितले. 

थेट शहा, मुख्यमंत्र्यांशी चर्चा 

दुसरीकडे राज्यस्तरीय नेत्यांपैकी पंकजा मुंडे, राम शिंदे, गिरीश महाजन, पाशा पटेल, चंद्रकांत पाटील यांच्या सभा मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयकाची जबाबदारी पार पाडत असून, थेट मुख्यमंत्री व अमित शहा यांच्याशी त्यांची याबाबत चर्चा होत असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. 

संबंधित लेख