भाजप मंत्र्यांच्या उपस्थितीत घेणार  मुख्यमंत्री शिवार संवादची माहिती 

भाजप मंत्र्यांच्या उपस्थितीत घेणार  मुख्यमंत्री शिवार संवादची माहिती 

मुंबई : राज्यात विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेला प्रतिउत्तर देण्यासाठी भाजपकडून राज्यात शिवार संवाद अभियान राबवण्यात आले या अभियानातील यश- अपयश याची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला भाजपच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यासोबत राज्य मंत्र्यांनाही बोलावण्यात आले असून सर्व मंत्र्यांची मुख्यमंत्री झाडाझडती घेणार असल्याचे सांगण्यात येते. 

शिवार संवाद अभियानाचा राज्यातील शेतकरी आणि जनमानसात प्रभाव पडण्याच्या दरम्यानच राज्यात शेतकरी संपाने वातावरण ढवळून निघाले असून यामुळे आज होणारी बैठक महत्वाची ठरणार असल्याचे सांगण्यात येते. 

शेतकरी संप मोडून काढण्यासाठी करण्यात आलेली खेळी कामी आली नाही, त्यातच शिवार अभियानातून नेमके मंत्री किती लोकांपर्यत पोहचले, आणि त्यासोबतच मंत्र्यांनी नेमके काय केले याचा सर्व लेखाजोखा या बैठकीत मांडला जाणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारची आणि विशेषतः भाजपाची रणनीती ठरवली जाणार आल्याचेही बोलले जाते. 

सत्तेत असलेल्या शिवसेनेने शेतकरी संपाला पाठिंबा दर्शविल्याने भाजपच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे, तर दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमान शेतकरी संघटनेतील सदाभाऊ खोत आणि शेट्टी वादामुळेही शेतकऱ्यांमध्ये सरकारची प्रतिमा डागाळली असल्याने या बैठकीत इतर विषयावरही चर्चा होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 
 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com