BJP & RSS office bearers discuss political developments | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

संघ आणि भाजप नेत्यांमध्ये औरंगाबादेत खलबते  

प्रकाश बनकर
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद, जालना, परभणी मतदारसंघाचा आढावा बैठकीत घेण्यात आल्याचे कळते.

औरंगाबाद: भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय सेवा संघाची औरंगाबादेत गुरुवारी (ता.11)तीन तास गुप्त बैठक पार पडली. औरंगाबाद, जालना, परभणी मतदारसंघाचा आढावा बैठकीत घेण्यात आल्याचे कळते.

या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा  अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आमदार संतोष दानवे अतुल सावे प्रशांत बंब माधव फड, नारायण कुचे,  विजय पुराणिक, जिल्हाअध्यक्ष, संगठना सरचिटणीस व संघाचे देवगिरी प्रांताचे रामानंद काळे, अनिल भालेराव, हरीश कुलकणी, डॉ. दिवाकर कुलकर्णी उपस्थित होते. 

संघाच्या प्रल्हाद भवन येथे दुपारी तीन वाजता या बैठकीला सुरुवात झाली. बैठकीत आगामी  लोकसभा आणि विधानसभा निवडणुका व इतर विषयांवर चर्चा झाली . मंत्रिमंडळ  विस्तारावर देखील बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत बैठक सुरू होती.

आगामी 2019 विधानसभा व लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने विविध मित्रपक्ष व संघटनांची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्याचाच एक भाग ही बैठक असल्याचे समजले जात आहे. 

राम मंदिरा  विषयी  हिंदुत्व संघटना शासनाच्या विरोधात भूमिका घेऊ लागल्यामुळे या संघटनांना एकत्र करण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला आहे.  बैठकीविषयी अत्यंत  गुप्तता पाळण्यात आली.

संबंधित लेख