पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भाजप पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा : पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या स्वीय सहाय्यकांवर रोष

निवडणुकीला तोंड फुटण्यापूर्वीच पालघर जिल्ह्यामध्ये भाजपला जोरदार धक्का बसला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भाजपचे पदाधिकारी , लोकप्रतिनिधीं आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.
Vishnu Sawra - BJP
Vishnu Sawra - BJP

मोखाडा : निवडणुकीला तोंड फुटण्यापूर्वीच पालघर जिल्ह्यामध्ये भाजपला जोरदार धक्का बसला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भाजपचे पदाधिकारी , लोकप्रतिनिधीं आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. आदिवासी विकास मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या स्वीय सहायकांवर या पदाधिकाऱ्यांचा रोष आहे. सवरा यांचे स्वीय सहायक वसंत सावंत यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

'सावंत आमचे फोनही घेत नाहीत आणि कार्यकर्त्यांची कामेही करत नाहीत', आदिवासी पदाधिकारी, लोकप्रतिनिधीं आणि कार्यकर्त्याना तुच्छतेची वागणूक देत त्यांची कामे न करता विरोधी पक्षाच्या धनाढ्य व्यक्ती चे कामे करतात. मंत्र्यांना भेटण्यास मज्जाव करण्याबरोबरच ते साहेबांपर्यत निरोप पोहोचवत नाही. असा या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. सावंत यांच्या विरोधात वरिष्ठांकडे अनेक वेळा तक्रार करून ही पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही अथवा त्यांना पदावरून हटविलेले नाही. त्यामुळे पदाधिकारी, लोकप्रतिनिधीं आणि कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.

या सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकार्यानी मोखाडा तालुक्‍यातील खोडाळा विश्राम गृहात बैठक घेऊन, सामुहिक राजीनामा अस्त्र उपसले असुन सामुहिक सह्यांचा राजीनामा पालघर जिल्हाध्यक्ष आमदार पास्कल धनारे यांना पाठविला आहे. त्यामुळे पालघर जिल्हा भाजप मध्ये खळबळ उडाली आहे. हे राजीनामा प्रकरण दुसऱ्यांदा घडले आहे. मात्र, निवडणूकीच्या तोंडावर च पालघर जिल्हयातील ग्रामीण भागात अव्वल स्थानावर असलेल्या भाजप मध्ये पुन्हा वाद ऊफाळून आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आम्ही पदाचे राजीनामे देत आहे. मात्र, निवडणूकीत भाजपलाच मतदार करू, परंतु निवडणूकीच्या प्रचारात अथवा पक्षाचे कुठलेही सक्रिय काम करणार नसल्याचे या पदाधिकार्यानी राजीनामा पत्रात नमूद केले आहे. या सर्व घडामोडी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णु सवरा यांच्या मतदारसंघात च घडल्याने भाजप ला मोठा धक्का बसला आहे.

या बैठकीस भाजप पालघर जिल्हा ऊपाध्यक्ष संतोष चोथे, मोखाडा तालुकाध्यक्ष रघुवीर डिंगोरे, विद्यार्थी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ऊमेश येलमामे, मोखाडा पंचायत समिती सदस्य मधुकर डामसे, माजी ऊपसभापती एकनाथ झुगरे, ऊप तालुकाध्यक्ष देवराम कडू, आदिवासी विकास आघाडीचे ऊमाकांत हमरे, सरचिटणीस नामदेव पाटील, मोखाडा शहर अध्यक्ष विलास पाटील, बाळासाहेब मुळे , विठ्ठल चोथे, पप्पु येलमामे, पांडुरंग कातवारे , मिलिंद झोले, प्रमोद काळे , हनुमंत पादीर यांसह अनेक ग्रामपंचायती चे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

गेली चार वर्षात आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णु सवरा यांचे स्वीय सहायक वसंत सावंत हे जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड तालुक्‍यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधीं आणि कार्यकार्यकर्त्याना तुच्छतेची वागणूक देत आहेत. पदाधिकाऱ्यांची , आदिवासी कार्यकर्ते यांची कामे होत नाही. त्यामुळे या सर्व तालुक्‍यातील कार्यकर्ते वैतागले आहेत. अनेक दा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु काहीही फरक झालेला नाही. त्यामुळे अखेरीस आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहुन पदाचे राजीनामे दिले आहेत.
- रघुवीर डिंगोरे, भाजप मोखाडा तालुका अध्यक्ष.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com