स्वातंत्र्यानंतर जितकी आंदोलने झाली त्याचे नेतृत्व संघ आणि भाजपने केले : पंतप्रधान मोदी

 स्वातंत्र्यानंतर जितकी आंदोलने झाली त्याचे नेतृत्व संघ आणि भाजपने केले : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या मुख्यालयाचे उद्घाटन आज (रविवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ''भारतीय जनता पक्ष देशासाठी मरणारा पक्ष असून, या नव्या मुख्यालयाचा आत्मा पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आहे. स्वातंत्र्यानंतर जितकी आंदोलने झाली त्या आंदोलनाचे नेतृत्व संघ आणि भाजपने केले याचा आम्हाला गर्व आहे'', असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 

दिल्ली येथील भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयाचे ठिकाण बदलले असून, आता यापुढे 11 अशोका रोडऐवजी 6, दीनदयाल उपाध्याय मार्ग असे ठिकाण असणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते.

मोदी म्हणाले, ''मी अमितभाई आणि त्यांच्या पूर्ण टीमचे अभिनंदन करतो. त्यांनी दिलेल्या वेळेत मुख्यालायाचे बांधकाम पूर्ण केले. त्यामुळे टीममध्ये उत्साह निर्माण व्हायला हवा. राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वात संघटनेने महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. या नव्या मुख्यालयाचा आत्मा पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आहे.''

दरम्यान, यापूर्वी ऑगस्ट 2016 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. दीनदयाल उपाध्याय मार्गावर 2 एकराच्या या परिसरात भाजपकडून या नवीन मुख्यालयाची बांधणी करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा या पाच मजली इमारतीत एकूण 70 खोल्या असणार आहेत. तसेच 400 वाहनांच्या पार्किंगची सोयही या मुख्यालयात असणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com