थेट भाजप कार्यालयातून शेतकऱ्यांना फोन ?   आमदार शिवार फेरीत आले होते का ?    

bjp_calling
bjp_calling

 मुंबई  :  'नमस्कार, मी भाजप कार्यालयातुन बोलत आहे. यंदा पाऊसपाणी ठीक आहे ना? काही अडीअडचणी वाटल्यास फोन करा,' असा फोन थेट शेतकऱ्यांना भाजप प्रदेश कार्यालयातून केले जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

भाजपची शिवार संवाद योजना शेतकऱ्यापर्यंत पोहचली की नाही याची भाजपच्या बँक ऑफिसकडून खातरजमा करून घेतली जात आहे .   हे फोन केल्याने शेतकरी सुखावत आहेत .  पक्षाच्या आमदार आणि पदाधिकारी यांनी दिलेली तपशीलवार माहिती बरोबर आहे का याचीही खातरजमा केली जात आहे.       

  भाजपच्यावतीने शिवार संवाद योजना राज्यभर राबवताना शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला होता. राज्य सरकारच्या योजना आणि शेतकऱ्यांसाठी भाजप सरकार काय करत आहे याची माहिती शेताच्या बांधावर देण्यात आली.  अमित शहा यांनी पक्षविस्तारासाठी हाती घेतलेला हा उपक्रम आहे .  तसेच यावेळी दीनदयाळ उपाध्याय जन्म शताब्दी निमित्ताने  कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  

बूथ लेव्हलवर विस्तारक म्हणून हजारो पदाधिकारी राज्याच्या कानाकोपऱ्यात  कार्यरत होते. काही विस्तारकांनी 15 दिवस काम केले तर काही विस्तारक महिनाभर, सहा महिने वर्षभर कार्य केले आहे.  प्रत्येक भाजप आमदार यांना स्वतः च्या मतदारसंघाव्यतिरिक्त दुसऱ्या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेली होती. 

ज्या शेतकऱ्यांची भेटीगाठी घेण्यात आल्या.  त्याचे संपर्क क्रमांक आणि नावे, ठिकाणी यांची नोंद असलेला अहवाल जिल्हानिहाय तयार करण्यात आला आहे. हा अहवाल प्रदेश भाजप कार्यालयात सादर करण्यात आलेला आहे. 

भाजप आमदार आणि भाजपच्या नेत्यावर जी विस्तारक म्हणून जबाबदारी दिलेली आहे. ती अचूक आणि काटेकोरपणे पार पडली का ? याची आता भाजप कार्यालयातून शहानिशा  केली जात आहे. हे शेतकरी स्थानिक आहेत का याची चौकशी केली जात आहे, त्यामुळे भाजप कार्यालयातून फ़ोन गेल्यानंतर समोरचा शेतकरी सुखावत असल्याचा अनुभव पदाधिकारी यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com