bjp news pune yogesh gogavale sanjay kakade | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

जुन्या आणि "अनफिट' लोकांना निवृत्त  करण्याचे पक्षाचे धोरण असेल तर मलाही कळवा 

उमेश घोंगडे 
रविवार, 17 सप्टेंबर 2017

पुणे : जुन्या आणि "अनफिट' लोकांना निवृत्त करण्याचे पक्षाचे धोरण शहराध्यक्ष म्हणून अद्याप माझ्यापर्यंत तरी आलेले नाही. तुमच्याकडे काही अधिकृत माहिती असेल तर मला जरूर कळवा,असे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी म्हटले आहे. पक्षाचे राज्यसभेतील सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी या संदर्भात केलेल्या वक्‍तव्याच्या पार्श्‍वभूमीवर गोगावले यांची ही उद्वीग्न प्रतिक्रिया दिली आहे. 

खासदार काकडे यांनी काल( शनिवारी) पत्रकारांशी बोलताना पक्षातील जुन्या तसेच "अनफिट' लोकांना निवृत्त करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धोरण असल्याचे म्हटले होते. काकडे यांच्या या भूमिकेबाबत गोगावले यांना प्रश्‍न केला असता त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. काकडे यांनी गेल्या महिन्यात भाजपच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांबाबत जी भाषा वापरली होती त्यावरूनही पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. सोशल मिडीयावरदेखील त्याची बरीच चर्चा झाली होती. हा सारा संदर्भ ताजा असताना काकडे यांच्या नव्या वक्तव्याने पक्षातील पदाधिकारी आणखी नाराज झाल्याचे स्पष्ट होत आहे. गोगावले हे शहराध्यक्ष झाल्यापासून पालकमंत्री गिरीश बापट यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे गोगावले यांची प्रतिक्रिया बरेच परिणाम करून जाणारी आहे. शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खासदार काकडे यांनी आपण संघाचे कार्यकर्ते असल्याचे म्हटले होते. त्यावरही तीव्र प्रतिक्रिया आली आहे. संघाचा कार्यकर्ता नसतो तर तो स्वयंसेवक असतो हे काकडे यांना माहित असायला हवे, अशी प्रतिक्रिया उमटली आहे. ज्यांना संघांचा स्वयंसेवक व कार्यकर्ता यातील फरक कळत नाही, त्यांना संघाचे धोरण कसे काय माहिती असा प्रश्‍न काही स्वयंसेवकांनी उपस्थित केला. 

संबंधित लेख