bjp nagpur | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

छत्तीसगडमध्ये रमणसिंहांचे राज्य खालसा; काँग्रेस आघाडीवर
मध्य प्रदेशमध्ये भाजप पुढे, भाजप - 108 कॉंग्रेस - 106
छत्तीसगढ विधानसभा - काँग्रेस 44 जागांवर आघाडीवर
मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत
हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी घेणार तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट
राजस्थानमध्ये काॅंग्रेस 91 तर भाजप 70 जागांवर आघाडीवर

भाजपच्या स्थापना दिनाला नेतेच गैरहजर 

सरकारनामा न्यूज ब्युरो 
गुरुवार, 6 एप्रिल 2017

नागपूर ः नागपुरात भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन कोणत्याही नेत्याच्या उपस्थितीशिवाय साजरा झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातील स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला एकही मंत्री, खासदार उपस्थित राहिले नाहीत. एवढेच नव्हे तर कुठल्या आमदारांनीही या कार्यक्रमाकडे फिरकून पाहिले नाही. 

टिळक पुतळा येथील नागपूर शहर भाजपच्या कार्यालयात स्थापना दिन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत साजरा होणार होता. परंतु ऐनवेळी बावनकुळे "व्यस्त' राहिल्याने महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, सत्तारुढ पक्षनेते संदीप जोशी उपस्थित होते. 
नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले. या पार्श्‍वभूमीवर यावर्षी स्थापना दिनाचा कार्यक्रम भव्य प्रमाणात साजरा करण्यात येईल, असे वाटत होते. परंतु यावर्षी स्थापना दिनाला नेत्यांनीच "बुट्टी' मारल्याने फारसे कार्यकर्तेही फिरकले नाही. 
नागपूर जिल्ह्यात भाजपचे विधानसभेत निवडून आलेले 11 आमदार आहेत. विधान परिषदेचे चार सदस्य आहेत. नागपुरातून राज्यसभेवर गेलेले 2 खासदार आहेत. त्यापैकी एकही आमदार व खासदाराने आजच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. 
 
संबंधित लेख