bjp mps meeting with amit shah in dehli | Sarkarnama

महाराष्ट्रात वणवा कां पेटला? अमित शाहंना खासदारांनी सांगितली कारणे 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या आंदोलनांना हिंसक वळण लागल्याने दिल्लीतील सत्तारूढ वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे. मराठा आंदोलनांपूर्वी शांततेत निघालेल्या मराठा मोर्चांची पुरेशी दखल राज्य सरकारने घेतली नाही व त्यामुळेच मराठा आंदोलनांचा वणवा पेटला, अशी भावना भाजप खासदारांमध्येही आहे. अमित शहा यांनी रात्री उशिरा बोलावलेल्या बैठकीतही काही खासदारांनी स्पष्टपणे हा मुद्दा उपस्थित केल्याची माहिती आहे. 

शहा यांनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीतही मराठा व अन्य समाजांच्या आरक्षण आंदोलनांबाबत चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. या वेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांचीही बैठकीला उपस्थिती होती. यापूर्वीच्या सरकारांनी आरक्षणाबाबत काहीही केले नाही व आता वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, महाराष्ट्रातील भाजप सरकारची नीती व नियत चांगली असल्यानेच मराठा आरक्षणाबाबत ठोस तोडगा काढण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्याचा ठोस संदेश राज्यभरात पोहोचवा, असे निर्देश शहा यांनी सत्तारूढ खासदारांना दिल्याची माहिती आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख