धनगर आरक्षणावर भाजप खासदार चिडीचूप ! 

पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या बैठकीत धनगर आरक्षणावर चर्चा झाली नाही. "टिस'च्या अहवालाची वाट आम्ही पाहत आहोत. तो दिलेल्या मुदतीत मिळावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.- डॉ. विकास महात्मे, खासदार
धनगर आरक्षणावर भाजप खासदार चिडीचूप ! 
धनगर आरक्षणावर भाजप खासदार चिडीचूप ! 

पुणे/नागपूर : चार महिन्यांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला होता. या बैठकीनंतर आरक्षण मिळणार नसल्याची चर्चा झाल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले होते. त्यामुळे काल दिल्लीत झालेल्या भाजप खासदारांच्या बैठकीत धनगर आरक्षणावर कोणी चकार शब्दही काढला नाही. 

लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून भाजपने महाराष्ट्रातील धनगर आरक्षणाला हवा दिली होती. प्रचारदौऱ्यात स्वत: मोदी यांनी सोलापूर, मिरज आणि पुणे येथील सभांत आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत बारामतीच्या प्रचारसभेतही मोदी त्यावर बोलले होते. राज्यस्तरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी वारंवार आश्‍वासने दिली आहेत, मात्र पुर्तता झालेली नाही. प्रत्येक अधिवेशनाला एसटी आरक्षाच्या मागणीसाठी मोर्चे, आंदोलने सुरु आहेत. मात्र ठोस कार्यवाही झालेली नाही. "टिस'च्या सर्वेक्षणाची वाट पहा, असे राज्य सरकारकडून सांगितले जात आहे. 

संसदेतही अनेक खासदारांनी हा विषय उपस्थित केला होता, मात्र शिफारशीचा मुद्दा केंद्राने राज्य सरकारकडे ढकलला आहे. आरक्षणाविषयी संभ्रमावस्था वाढत असताना 30 मार्च रोजी दिल्लीत पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला. राज्यातील सर्व भाजप खासदार या बैठकीला उपस्थित होते. धनगर आरक्षणाच्या मुद्यावर समाजाचे नेतृत्व करत असलेले आणि भाजपने राज्यसभेत पाठवलेले डॉ. विकास महात्मे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. या बैठकीत मोदी यांनी धनगर समाजाच्या एसटी समावेशाला स्पष्टपण नकार दिला होता. तशा बातम्या आल्यानंतर राज्यात गदारोळ माजला. मोठ्या प्रमाणात टीका झाल्याने भाजपला बॅकफूटवर यावे लागले. डॉ. महात्मे यांना तर हा विषयच बैठकीत आला नाही, असा खुलासा करावा लागला. 

चार महिन्यानंतर मोदींनी पुन्हा राज्यातील भाजप खासदारांची बैठक काल दिल्लीत घेतली. या बैठकीत मोदींनी आगामी निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. तसेच तुमच्या मतदारसंघातील कोणती कामे प्रलंबित आहेत, आपण दिलेली कोणती आश्‍वासने पुर्ण झालेली नाहीत, याची माहिती विचारली. सोलापरचे खासदार शरद बनसोडे यांनीच ही माहिती माध्यमांना दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्यादृष्टीने, विशेषत: 20 हून अधिक लोकसभा मतदारसंघाच्यादृष्टीने धनगर आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. स्वत: मोदींनी तीन मतदारसंघातील सभांत आरक्षणाचे आश्‍वासन दिले आहे. हे वास्तव असताना एकाही खासदाराने हा प्रश्‍न सांगितला नाही. डॉ. महात्मे यांनीही यासंबंधी चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com