bjp mla upset on commissioner kunal kumar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

आयुक्त कुणाल कुमारांवर भाजप आमदार नाराज! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 जुलै 2017

पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमारांच्या कारभाराबद्दल येत्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त करणार असल्याचे आमदार विजय काळे यांनी म्हटले आहे. 

पुणे: पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमारांच्या कारभाराबद्दल येत्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त करणार असल्याचे आमदार विजय काळे यांनी म्हटले आहे. 

स्थायी समितीचे अध्यक्षांबरोबरही आयुक्तांचे खटकले. त्याही विषयी माहीती घेऊन मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचे काळे म्हणाले. अन्य आमदारांमध्येही आयुक्तांबद्दल नाराजी आहे. आयुक्तांच्या आडमुठ्या भूमिकेचा परिणाम विकासकामांवर होत असल्याचेही आमदार म्हणतात. आमदारांच्या विकास निधीतली कामे आयुक्तांच्या सहकार्याने होणार आहेत. पण विकासकामांसाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा ही मागणीही आयुक्तांनी पुर्ण केली नाही. याचीही नाराजी आमदारांमध्ये आहे. म्हणूनच काळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर आयुक्तांबाबतचे गाऱ्हाणे घालण्याचे ठरविले आहे. 

संबंधित लेख