bjp mla suresh halwankar criticise chagan bhujbal | Sarkarnama

फुले विकणाऱ्या भुजबळांनी आठ हजार कोटींची माया जमवली : हाळवणकर 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 जुलै 2018

सांगली : एकेकाळी फुले विकणाऱ्या छगन भुजबळ यांनी आठ हजार कोटीची माया जमवली. त्यांना नियतीने धडा दिला आणि तुरुंगात जावे लागले', अशी टीका इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी केली. 

सांगली : एकेकाळी फुले विकणाऱ्या छगन भुजबळ यांनी आठ हजार कोटीची माया जमवली. त्यांना नियतीने धडा दिला आणि तुरुंगात जावे लागले', अशी टीका इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी केली. 

सांगली महापालिका निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचारसभेत बोलताना त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. हाळवणकर म्हणाले,"" मुंबईत माझगाव डॉकयार्डमध्ये एकेकाळी फुले विकणाऱ्या छगन भुजबळ यांनी आठ हजार कोटीची माया जमवली. ऑर्थर जेलचे उद्‌घाटन त्यांच्याहस्ते झाले होते. उद्‌घाटनावेळी त्यांनी इथे खिडकी हवी, इथून उजेड आला पाहिजे अशा सूचना दिल्या. परंतू त्यांना काय माहीत की याच जेलमध्ये त्यांना यावे लागेल. नियतीने त्यांचा बदला घेतला.'' 

संबंधित लेख