आमच्या चिंध्या करण्याची  भाषा वापरायला इथे  मोगलाई माजली काय ? - आमदार स्नेहलता कोल्हे

अशा वक्तव्याला मी घाबरणार नाही, त्यांना जशास तसे उत्तर देऊ.- आमदार स्नेहलता कोल्हे
Kolhe_kale
Kolhe_kale

नगर : "  राष्ट्रवादी काॅग्रेसचे आशुतोष काळे यांनी जाहीर सभेत आमच्याविषयी वापरलेले शब्द निंदनीय आहेत. महिला आमदार असतानाही ते असे बोलले. भाजपच्या महिला नगरसेविकांना चिंध्या करून टाकू, असा मेसेज सोशल मीडियावर जिजाऊ महिला मंडळाच्या काळे गटाच्या अध्यक्षांनी टाकून मोठा पराक्रम केला असे त्यांना वाटत असेल. चिंध्यांची भाषा करायला येथे मोगलाई माजली का? अशा वक्तव्याला मी घाबरणार नाही, त्यांना जशास तसे उत्तर देऊ," असा इशारा कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांनी विरोधकांना दिला.

शनिवारी राष्ट्रवादी काॅग्रेसचे काळे व भाजपच्या आमदार स्नेहलात कोल्हे यांच्या कार्यकर्त्यात  जोरदार मारामारी झाली. राष्ट्रवादीचे युवा नेते आशुतोष काळे यांनी हल्लाबोल यात्रेच्या वेळी आमदार कोल्हे यांच्यावर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपच्या नेत्यांनी काळे यांचा पुतळा जाळून निषेध करण्याचे नियोजन केले होते. याच दरम्यान काळे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखल्याने दोन्ही गटात मारामारी झाली होती. कोपरगाव पोलिस ठाण्यात दोन्ही बाजुंनी परस्परांविरोधात महिलांची छेडछाड काढली, काठीने मारहाण केली, या कारणावरून गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत आमदार कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीच्या आशुतोष काळे यांचा समाचार घेतला.

आमदार कोल्हे म्हणाल्या, की " ज्येष्ठ नेते शंकरराव काळे व शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर एकमेकांविरोधात राजकारण केले,पण कुटुंबावर व व्यक्तिगत कधीही टीका केली नाही. विकासाच्या विषयावर त्यांनी एकमेकांवर आरोप केले. मात्र राष्ट्रवादीच्या आशुतोष काळे यांनी आमच्यावर अत्यंत खालच्या पातळीवरील टीका केली. त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. माझ्या कार्यकर्त्यांवर धावून जात असेल, तर मी गप्प बसणार नाही. महिलांना पुढे घालून त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे खोटे आहेत. महिला काय द्वेष व फिर्याद दाखल करण्याची गोष्ट आहे का?  याबाबत आम्ही जशास तशे उत्तर देऊ.अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू, "असा इशारा कोल्हे यांनी दिला.

" भाजपच्या काळात कामे वेगाने होत आहेत. कोपरगाव ते कोळपेवाडी या रस्त्याला राज्य महामार्गाचा दर्जा देऊन कामेही सुरू झाली आहेत. हे विरोधकांना खपत नसावे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, त्यामुळे ते असे बेताल वक्तव्य करीत आहेत. त्यांना त्यांच्या माहेगाव देशमुख गावातच विकास करता आले नाही, ते काय तालुक्याचा विकास करणार.तालुक्याच्या प्रश्नावर त्यांनी आमने-सामने चर्चा करावी. त्यांना उत्तर दिले जाईल. असे सोशल मीडियावर गरळ ओकता कशाला,विकासकामांबाबत आमने-सामने चर्चेसाठी या," असे आवाहन कोल्हे यांनी काळे यांना दिले.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com