BJP MLA Pune Politics Shiralsheth | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

औटघटकेच्या 'त्या' राजाला झालाय मुखवट्याचा मोह.

प्रसाद पाठक
शनिवार, 29 जुलै 2017

भाजपचा हा आमदार त्या कुटुंबाच्या मागे लागलाय. मुखवटा मला द्या. त्याच्या ऐवजी फायबरचा मुखवटा करा, मी मुखवट्याचा खर्च देतो. पण जुना मुखवटा मलाच पाहिजे. लाकडात कोरलेला तो जुना मुखवटा अतिशय रेखीव असून वजनदार आहे. मुखवटा उचलायलाच पाच-सहा माणसे लागतात. त्याची सुबकता पाहून तो आमदार त्या मुखवट्यावर डोळा ठेवून बसलाय.

पुणे : औटघटकेच्या राजा श्रीयाळशेठ. श्रावणातल्या षष्ठीला त्याच्या मुखवट्याची पूजा होते. पुण्यात रास्तापेठेत दरवर्षी राजाचा उत्सव साजरा होतो. पूजेसाठी लाकडात कोरलेला सुबक मुखवटा असतो. एका कुटुंबाने त्यांच्या पाच पिढ्यांपासून तो मुखवटा जतन करून ठेवलाय. पण त्याच मुखवट्यावर गेल्या काही वर्षांपासून एका आमदाराचा डोळा आहे.

भाजपचा हा आमदार त्या कुटुंबाच्या मागे लागलाय. मुखवटा मला द्या. त्याच्या ऐवजी फायबरचा मुखवटा करा, मी मुखवट्याचा खर्च देतो. पण जुना मुखवटा मलाच पाहिजे. लाकडात कोरलेला तो जुना मुखवटा अतिशय रेखीव असून वजनदार आहे. मुखवटा उचलायलाच पाच-सहा माणसे लागतात. त्याची सुबकता पाहून तो आमदार त्या मुखवट्यावर डोळा ठेवून बसलाय. त्या आमदाराला त्याच्या संग्रहालयात तो मुखवटा ठेवायचा आहे. तो आमदार त्या कुटुंबाकडे सातत्याने विचारणा सांगतोय.. "मुखवटा मला द्या,मला द्या."

खरंतर पाच वर्षांसाठी निवडून आलेल्या त्या आमदाराचे राज्यही औटघटकेचेच. कोणी भूखंडाच्या प्रेमात पडतं. तर कोणी मालमत्तेच्या पण 'त्या' राजाला औटघटकेच्याच राजाच्या मुखवट्याचा मोह का जडलाय? एवढं काय
त्या मुखवट्यात दडलंय की, चक्क आमदारच मुखवट्याच्या प्रेमात पडलेत? हीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे.

सरकारनामाच्या अन्य बातम्यांसाठी क्लिक करा

फडणवीस आणि विखे यांचे राधा-कृष्णासारखे प्रेम : बच्चू कडू

आझमी आणि पठाण यांचे वक्तव्य ही ‘व्होट बँके’चीच मस्ती - उद्धव ठाकरे

महाराष्ट्रासाठीही 'गुजरात पॅटर्न' तयार : विरोधी पक्षातील चार नेत्यांवर जाळे?

नगर जिल्ह्यात मिशन "राष्ट्रवादी'

 

 

 

 

संबंधित लेख