भाजपचे आमदार महेश लांडगे यांचे जनसंपर्क कार्यालय बनले  हायटेक

हेल्पलाइनहीभोसरीतील नागरिकांना आपल्या समस्या तात्काळ सोडविता याव्यात यासाठी आमदार महेश लांडगे यांनी 'परिवर्तन' ही हेल्पलाइनही सुरु केली आहे.त्यामुळे रहिवाशांना जनसंपर्क कार्यालयात जाण्याची गरज राहिलेली नाही. ते घरबसल्या तक्रार देत आहेत. त्याव्दारे गेल्या तीन वर्षांत रहिवाशांच्या हजारो तक्रारींचे घरबसल्या निवारण झाले आहे. 'परिवर्तन'ला आएसओ मानांकन प्राप्त आहे.
MLA-Lange-hitech-office
MLA-Lange-hitech-office

पिंपरीःभाजपच्या 'डिजिटल इंडिया'त या पक्षाचे पिंपरी-चिंचवडमधील (भोसरी) सहयोगी आमदार महेश लांडगे यांचे जनसंपर्क कार्यालय त्याला साजेसे असेच हायटेक व कॉर्पोरेट आहे.तेथे तरुण स्टाफच्या मदतीला निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांची विशेष टीम देण्यात आली आहे. 

भोसरी येथील शितलबाग परिसरात पुणे-नाशिक महामार्गालगत लांडगे यांचे हे जनसंपर्क कार्यालय आहे.तेथे समस्यानिहाय नऊ विभाग केले गेले आहेत.प्रत्येक विभागाची जबाबदारी एकेका सुशिक्षित तरुणाकडे देण्यात आली आहे.त्यांची बैठक आमदार पंधरवड्यातून एकदा घेतात.

 जनसंपर्कासाठी नेमण्यात आलेल्या स्टाफच्या जोडीला एक विशेष टीम आहे.त्यात निवृत्त प्रशासकीय अधिकारी, विधानभवन, मंत्रालयात काम केलेले माजी अधिकारी,महिला संघटक, सल्लागार यांचा समावेश आहे. ते बॅक ऑफीस सांभाळतात. ते कार्यालयातील स्टाफला सूचना देतात.

त्यांच्या कामाचे नियोजन करतात.त्याद्वारे निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवले जाते. आमदार लांडगे यांचे लहान बंधू आणि उद्योजक कार्तिक लांडगे यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण जनसंपर्क कार्यालयाचे कामकाज चालते. 

कसे चालते कामकाज? 

भोसरी मतदार संघामध्ये  विकास घडवून आणण्याचे आश्वासन  महेश लांडगे यांनी निवडणुकीपूर्वी मतदारांना दिले होते. त्यानुसार, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, मतदार संघातील विविध प्रश्न सोडविणे, महिला व युवकांचे संघटन, त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करुन देणे, विविध अभिनव योजना राबविणे आदी कामे कार्यालयामार्फत केली जातात.

नोकरीविषयक एचआर विभाग कार्यरत आहे. विशेष म्हणजे, भोसरी मतदारसंघातील प्रत्येक प्रभागनिहाय एका आमदार कार्यालय स्वयंसेवकाची नियुक्ती केली आहे. त्याद्वारे त्या त्या विभागातील समस्यांचे निराकरण केले जाते. 

कार्यालयातील विभाग : 
मंत्रालय संबंधी कामकाज  
महापालिका संबंधी कामकाज  
नोकरी विषयक सल्ला विभाग 
सामाजिक संस्था संघटना समन्वय 
नगरसेवक समन्वय समिती 
आरोग्य विषयक विभाग 
शैक्षणिक योजना विभाग 
नागरी समस्या निराकरण 
महिला समस्या निराकरण विभाग 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com