bjp mla and martha morcha | Sarkarnama

भाजप आमदार अतुल सावेंच्या कार्यालसमोर थाळीनाद

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरातील आमदार-खासदारांच्या कार्यालयसमोर आंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवारी (ता.तीन) औरंगाबाद पुर्वचे भाजप आमदार अतुल सावे यांच्या संपर्क कार्यालसमोर मराठा क्रांती मोर्चातर्फे थाळीनाद करण्यात आला. मराठा आरक्षणासाठी आमदार सावेंनी विधानसभेत भक्कमपणे बाजू मांडावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी निवदेनाद्वारे केली. अतुल सावे यांनी स्वतः निवेदन स्वीकारावे अशी आंदोलकांची मागणी होती. पण ते आलेच नाही. त्यांच्या वतीने भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी हे निवेदन स्वीकारले. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहेत. लोकप्रतिनिधींच्या विरोधात देखील आंदोलकांचा राग असल्यामुळे त्यांना आंदोलनापासून दूर ठेवण्यात आले आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे अनेक आमदार सध्या नॉटरिचेबल आहेत. लोकप्रतिनीधींना फोनवरून राजीनामा देण्याची मागणी गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने अनेकांनी आपले फोन बंद करून ठेवले आहेत. लोकप्रतिनिधींबद्दल आंदोलकांच्या मनात असलेला राग व्यक्त करण्यासाठी त्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

त्यानुसार शहरातील आमदार अतुल सावे यांच्या पुंडलीकनगर रोडवरील संपर्क कार्यालसमोर आज थाळीनाद करण्यात आला. यावेळी सरकार व आमदार सावे, खासदार चंद्रकांत खैरे,विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

संबंधित लेख