bjp ministers show arrogance : Raj thakrey | Sarkarnama

भाजपच्या मंत्र्यांना सत्तेचा माज आलाय : राज ठाकरे यांचा हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

पुणे : अवनी या वाघिणीच्या हत्येच्या निमित्ताने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे बेफिकीरपणे उत्तरे देत आहेत. भाजपच्या मंत्र्यांना सत्तेचा माज आला आहे. हा माज येत्या निवडणुकीत उतरावा लागेल. निवडणुकीचे घोडामैदान जवळ आहे, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी इशारा दिला. 

अवनी या वाघिणीला ठार मारण्याची गरज नव्हती. तिला भूल देऊन पकडता आले असते. मात्र आपण करू तेच खरे, अशी भाजपच्या नेत्यांची भूमिका असल्याची टीका राज यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली. त्यांनी अंबानीसाठी देश विकायला काढला आहे का, असा सवालही त्यांनी केला. हाच प्रकार गुजरातमधील सिंहाबाबत झाला असता किती वातावरण पेटले असते. मात्र मोदींच्या आशिर्वादाने हे सरकार सत्तेवर आले असल्याने त्यांना ना माणसांची ना प्राण्यांची फिकीर आहे. त्यांना माणसांपेक्षा पुतळे महत्त्वाचे आहेत, असा टोला त्यांनी लगावला. 

मुनगंटीवार हे वनमंत्री असले तरी ते विषयात सर्वज्ञ नाहीत. वाघांचे किंवा इतर प्राण्यांचे संगोपन करण्यासाठी परदेशात मोठ्या प्रमाणात काम चालते. त्यातील तज्ञांना बोलावून आपण प्रयोग करू शकतो. मात्र सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. अंबानीच्या प्रकल्पासाठी वाघिणीला मारल्याचे मला वृत्तपत्रांतून कळाले. अंबानींसाठी आणखी काय काय करणार? कोण हा अंबानी, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. 
 
संबंधित लेख