bjp mahila morcha | Sarkarnama

भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष कोण? 

सरकारनामा ब्युरो 
शुक्रवार, 10 मार्च 2017

नागपूर महिला मोर्चाच्या अध्यक्षा नंदा जिचकार यांची महापौरपदी निवड झाली आहे. "एक व्यक्ती एक पद' या नियमाने जिचकार यांना महिला मोर्चाच्या
अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. 

नागपूर : नागपूर भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदासाठी नगरसेविका चेतना टांक, कीर्ती अजमेरा, विशाखा मोहोड यांच्या नावांची चर्चा आहे. 
नागपूर महिला मोर्चाच्या अध्यक्षा नंदा जिचकार यांची महापौरपदी निवड झाली आहे. "एक व्यक्ती एक पद' या नियमाने जिचकार यांना महिला मोर्चाच्या
अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून जिचकार महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होत्या. नागपुरात 108 भाजपच्या नगरसेवकांमध्ये 61 महिला आहेत. नागपूर भाजपच्या महिला मोर्चाची जबाबदारी सोपविण्यासाठी नगरसेविका चेतना टांक यांचे नाव अधिक चर्चेत आहे. पूर्व नागपुरातून भाजपचे 23 नगरसेवक निवडून आले आहेत. पूर्व नागपूरला कोणतेही पद मिळालेले नसल्याने चेतना टांक यांची निवड होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. तसेच कीर्ती अजमेरा या पदासाठी प्रयत्नशील आहेत.

कीर्ती अजमेरा यांनी यापूर्वी महिला मोर्चाची जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय विशाखा मोहोड यांच्याकडेही ही जबाबदारी येऊ शकते. महापौरपदासाठी
विशाखा मोहोड यांचे नाव चर्चेत होते. परंतु जातीय समीकरणामुळे विशाखा मोहोड यांची संधी हुकल्याचे बोलले जात आहे. ही नाराजी त्यांना महिला मोर्चाचे
अध्यक्षपद देऊन दूर केली जाऊ शकते. 

संबंधित लेख