BJP Leaders in Nashik Say we got Tukaram Mundhe Transferred | Sarkarnama

भाजपवाले म्हणतात.... "शुऽऽऽs सांगू नका, तुकाराम मुंढेंची आम्ही बदली केली!'' 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

सोशल मिडीयावर आज महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली अशी पोस्ट व्हायरल झाली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. प्रत्येकजण त्याबाबत खातरजमा करीत होता. मात्र, पोस्टचा सोर्स सापडेना. खातरजमा होईना. यावेळी भाजपचे महापालिका पदाधिकारी म्हणत होते, "शुऽऽऽऽ कोणाला सांगु नका. आम्ही तुकाराम मुंढेंची बदली केली. 

नाशिक : सोशल मिडीयावर आज महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली अशी पोस्ट व्हायरल झाली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. प्रत्येकजण त्याबाबत खातरजमा करीत होता. मात्र, पोस्टचा सोर्स सापडेना. खातरजमा होईना. यावेळी भाजपचे महापालिका पदाधिकारी म्हणत होते, "शुऽऽऽऽ कोणाला सांगु नका. आम्ही तुकाराम मुंढेंची बदली केली. 

आज शासकीय सुटी असल्याने या बातमीची खातरजमा होत नव्हती. महापालिकेत बदलीचा कोणताही आदेश आलेला नव्हता. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी संपर्क केला असता "मला याबाबत काहीही माहिती नाही'', असे त्यांनी सांगितले. मात्र, बदलीच्या या बातमीचा एकाकडून दुसऱ्यापर्यंत आणि एका ग्रुप वरुन दुसऱ्या ग्रुपपर्यंतचा प्रवास थांबत नव्हता. आयुक्त मुंढे यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती झाल्याची चर्चा होती. 

डॉ. गमे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. याविषयी महापालिकेतील भाजप नेत्यांशी संपर्क केल्यावर "शुऽऽऽ आता बोलु नका. आम्ही मुंढे यांची बदली केली आहे. आदेश हाती पडल्यावर खातरजमा होईल," असे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगण्यात आले. त्यामुळे शहरात मुंढेंच्या बदलीने भाजप नेत्यांची कळी खुलली. तर नागरिकांत मात्र नाराजीचा सूर होता. 

संबंधित लेख