BJP Leader Khadse Recived Threat Call | Sarkarnama

भाजप नेते खडसेना परदेशातून धमकीचा फोन

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

भाजपचे नेते व राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना तसेच त्यांच्या दोन्ही पोलीस सुरक्षा रक्षकांनाही मोबाईलवरून धमकीचा फोन आल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे खडसे यांनी तीन वेगवेगळे पत्र देऊन चौकशीची मागणी केली आहे.

जळगाव : भाजपचे नेते व राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना तसेच त्यांच्या दोन्ही पोलीस सुरक्षा रक्षकांनाही मोबाईलवरून धमकीचा फोन आल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे खडसे यांनी तीन वेगवेगळे पत्र देऊन चौकशीची मागणी केली आहे.

सोमवारी पहाटे 5 वाजून 40 मिनीटांनी 0025771043771 या क्रमांकावरून कॉल आला. त्यानंतर पहाटे सहा वाजून वीस मिनीटांनी त्यांचे पोलीस सुरक्षा रक्षक गणेश पाटील यांच्या मोबाईलवर 0025771051803 या क्रमांकावरून कॉल आला. यानंतर सकाळी दहा वाजता दुसरे सुरक्षा रक्षक तुषार मिस्तरी यांच्या मोबाईलवर 0025771056760या क्रमांकावरून कॉल आला. या तीनही कॉलवर पलीकडून महिलेच्या आवाजात ..संभलके रहो!हेच दोन वेळा सांगण्यात आले. खडसे यांनी तीनही कॉल संदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कऱ्हाळे यांना तीन वेगळ्या लेखी तक्रार अर्ज देवून चौकशीची मागणी केली आहे.

 

संबंधित लेख