bjp in latur palika | Sarkarnama

लातूर महापालिकेमध्ये भाजपमधील वाद चव्हाट्यावर

हरी तुगावकर
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

लातूर : लातूरकरांनी मोठ्या विश्वासाने महापालिकेची सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हातात दिली. पण अतंर्गत लाथाळ्यामुळे गेली एक दीड वर्ष हा पक्ष नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरताना दिसत नाही. आता तर राजीनामा नाट्य रंगत आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, समितीचे सर्व सदस्य, स्वीकृत सदस्यांनी राजीनामे दिले असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष सांगत आहेत. पण मी आजही सभापतीच आहे, असे स्थायी समितीच्या सभापतींनी स्पष्ट केले आहे. तर काही सदस्यांनी आपण राजीनामे दिले नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. 

राजीनामा नाट्याची चर्चा 
महापालिकेत विरोधकापेक्षा सत्ताधारी भाजपमध्येच अधिक गटबाजी पहायला मिळत आहे. पदाधिकारी व सदस्यात बेबनाव असल्याचे सातत्याने स्पष्ट होत आहे. कधी महापौर एकटे पडतात तर कधी स्थायी समितीचे सभापती एकटे पडताना दिसत आहेत. याच्या तक्रारी पक्षश्रेष्ठींकडे गेल्या आहेत. आठ दिवसापूर्वी झालेल्या एका बैठकीत पदाधिकारी, स्थायी समितीचे सदस्य, स्वीकृत सदस्यांनी राजीनामे द्यावेत असे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले होते. रविवारी (ता. ) प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे लातूर दौऱयावर आले होते. ते येथून गेल्यानंतर राजीनामा नाट्याने उचल खाल्ली. पदाधिकारी व सदस्यांनी राजीनामे दिल्याचे सोशल मिडियावरून कसे येईल ते पाहण्यात आले. राजीनामा नाट्याची चर्चाही रंगविण्यात आली. यावर महापौर सुरेश पवार व उपमहापौर 
देविदास काळे यांनी मात्र बोलण्याचे टाळले. 

नगरसेवकात पसरली नाराजी 
पदाधिकारी किंवा नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींचा आदेश मानून शहराध्यक्षांकडे राजीनामे दिले होते. ही बाब पक्षांतर्गत आहे. ती मिडियाकडे आल्याने पक्षाचीच यात अधिक बदनामी झाली आहे. या बाबत पक्षातील नगरसेवकात नाराजी पसरली आहे. महापालिकेत सोमवारी आलेल्या नगरसेवकात ही नाराजी दिसून आली. 

पक्ष हिम्मत दाखवणार का? 
महापौर, उपमहापौर किंवा स्थायी समितीच्या सभापतींनी राजीनामा द्यायचा असेल तर आयुक्तांकडे द्यावा लागतो. त्यानंतर तो शासनाकडे पाठवून मंजूर केला जातो. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम राबविला जातो. पण येथे तसेच काहीच झालेले नाही. शहराध्यक्षांकडे हे राजीनामे दिले गेले आहेत. हे राजीनामे आयुक्ताकडे देण्याची हिम्मत पक्ष दाखवणार का ? की राजीनामा नाट्यच राहणार याकडे पक्षातील नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. 

योग्य निर्णय लवकरच - लाहोटी 
पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, समितीच्या काही सदस्यांनी आपल्याकडे राजीनामे दिले आहेत. पक्षाच्या आदेशानुसार योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे भाजचे शहराध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी सांगितले. 

सभापती मीच - शैलेश गोजमगुंडे 
पक्षाचा मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे. वीस वर्षापासून पक्षाच्या चौकटीत राहून काम करीत आहे. मी आजही सभापती आहे. माझ्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या एका समितीची आज बैठक घेवून मी निर्णयही घेतला आहे. माझे कामकाज सुरु आहे असे महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे यांनी सांगितले. 

संबंधित लेख