BJP Govt is Shameless alleges Ashok Chavan | Sarkarnama

भाजपा सरकार बेशरम आहे - अशोक चव्हाण 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 11 जुलै 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता ४३ वर्षापूर्वीच्या आणीबाणीची आठवण झाली आणि त्यांनी गांधी परिवारावर टीका केली. कित्येक वर्षे देशाचा परिवार गांधी परिवाराने सांभाळला. परंतू, ज्यांना स्वतःचा परिवार नाही त्यांना परिवाराचे महत्व काय कळणार? काळा पैसा भारतात आणण्याच्या गोष्टी करणा-या भाजपा सरकारमुळे देशातील पांढरा पैसा मात्र परदेशात गेला - अशोक चव्हाण

भोर : ''राज्यात महिलांवरील अत्याचार वाढलेले असून जनतेला जीवन सुरक्षित वाटत नाही. परंतु, या सरकारला मात्र त्याची चिंता नाही कारण हे सरकार बेशरम सरकार आहे. बुलेट ट्रेन जाऊ द्या परंतु मुंबईची लोकल ट्रेन त्यांना नीट चालविता येत नाही. या सरकारचा फाजील आत्मविश्वास त्यांना दाखविण्याची वेळ आली आहे," अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथे केली. 

येथील अभिजीत भवन कार्यालयात बुधवारी (ता.११) भोर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री अनंतराव थोपटे, आमदार संग्राम थोपटे, काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस पृथ्वीराज साठे, जिल्हाध्यक्ष संजय जगताप, माजी अध्यक्ष देवीदास भंन्साळी, तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, महिलाध्यक्षा गितांजली शेटे, दिलीप बाठे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निर्मला आवारे, नगरसेवक पदाचे उमेदवार पद्मिनी तारु, चंद्रकांत मळेकर, समीर सागळे, आशा रोमण,सचिन हर्णसकर, तृप्ती किरवे, रुपाली कांबळे, अमित सागळे, अम़ृता बहिरट, गणेश पवार, वृषाली घोरपडे, देविदास गायकवाड, सोनम मोहिते, अनिल पवार, स्नेहा पवार, आशा शिंदे व सुमंत शेटे आदीं उपस्थित 
होते.

अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात केंद्र व राज्य सरकारवर टीका करून जनतेचा सरकारवरील रोष व्यक्त केला. चव्हाण म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता ४३ वर्षापूर्वीच्या आणीबाणीची आठवण झाली आणि त्यांनी गांधी परिवारावर टीका केली. कित्येक वर्षे देशाचा परिवार गांधी परिवाराने सांभाळला. परंतू, ज्यांना स्वतःचा परिवार नाही त्यांना परिवाराचे महत्व 
काय कळणार? काळा पैसा भारतात आणण्याच्या गोष्टी करणा-या भाजपा सरकारमुळे देशातील पांढरा पैसा मात्र परदेशात गेला." 

देशात अदृश्य आणिबाणी लागू झाली असल्याचे सांगत गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण ३८ टक्यांनी वाढले आहे,अशी टीकाही त्यांनी केली. भोर नगरपालिकेतील काँग्रेसची सत्ता कायमच राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माजी नगराध्यक्ष अॅड. जयश्री शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्रा. उमेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

सरकारनामाच्या अन्य बातम्या - 

संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी विधानपरिषदेत गोंधळ 

सूर्यवंशी बंधूंचा जयंत पाटलांचा चकवा; पुन्हा भाजपसोबत! 

पहाटे मोहिम फत्ते करीत जयंत पाटलांनी दिला भाजपला धक्‍का!

दूध उत्पादकांसाठीची घोषणा फसवी, सरकारला सळो की पळो करून सोडणार- रविकांत तुपकर 

`नाणार'वरून शिवसेनेने बदला घेतला? 

संबंधित लेख