BJP government supports farmers : Danave | Sarkarnama

भाजप सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने : खा. रावसाहेब पाटील-दानवे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 जून 2017

केवळ अल्पभूधारक नव्हे तर सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय रविवारी केल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सरकार सदैव शेतकऱ्यांची बाजू घेत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्चाधिकार समितीचे प्रमुख महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील-दानवे यांनी व्यक्त केली.

मुंबई : केवळ अल्पभूधारक नव्हे तर सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय रविवारी केल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सरकार सदैव शेतकऱ्यांची बाजू घेत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्चाधिकार समितीचे प्रमुख महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील-दानवे यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने आणि भाजपच्या राज्य सरकारने आतापर्यंतची सर्वाधिक मदत शेतकऱ्यांना केली आहे. रविवारचा निर्णयसुद्धा शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेऊन मदत करण्याचा आहे. या पुढील काळातही शेतकऱ्यांवर संकट आले तर भाजपाचे सरकारच ठामपणे त्यांच्या पाठीशी राहील.

त्यांनी सांगितले की, राज्यात पावसाचे आगमन झाले असतानाच शेतकरी संप मागे घेण्यासाठी तोडगा निघाला. कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय झाला. शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरणीच्या कामाला लागावे अशा या घडामोडी आहेत.

संबंधित लेख