BJP deputy Mayor arrested for beating Mateen | Sarkarnama

भाजपच्या उपमहापौरांना नगरसेवक मतीन मारहाण प्रकरणात अटक 

सरकारनामा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

मतीन प्रमाणेच त्याला मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकांना देखील अटक करा अशी मागणी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली होती.

औरंगाबादः भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधना निमित्त महापालिकेत आयोजित केलेल्या श्रध्दांजली सभेला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यास भाजप नगरसेवकांनी (ता.17) सभागृहात मारहाण केली होती.

या प्रकरणात भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांना पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. मयुरपार्क भागातील संपर्क कार्यालयातून औताडे यांना सिटीचौक पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. 

सय्यद मतीन याला सभागृहात बेदम मारहाण करण्यात आली होती. भाजपच्या वतीने उपमहापौर औताडे यांच्या तक्रारीवरून मतीनला पोलीसांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती.

तर मतीन याच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलीस ठाण्यात भाजपचे उपमहापौर विजय औताडे, भाजप गटनेते प्रमोद राठोड, नगरसेवक राजगौवरव वानखेडे, रामेश्‍वर भादवे या चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

मतीन प्रमाणेच त्याला मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकांना देखील अटक करा अशी मागणी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली होती.

आज गुन्हा दाखल झालेल्या भाजपच्या नगरसेवकांना अटक होणार अशी चर्चा सुरू असतांनाच उपमहापौर औताडे यांच्या रुपाने पहिली अटक करण्यात आली आहे. सायंकाळपर्यंत इतर तीन नगरसेवकांना देखील अटक होणार असल्याचे बोलले जाते.
 

संबंधित लेख