साताऱ्याची जागा घेण्यासाठी भाजपने जोर लावला!

साताऱ्याची जागा घेण्यासाठी भाजपने जोर लावला!

सातारा : सातारा लोकसभेची जागा युतीच्या वाटणीत शिवसेनेच्या वाट्याला गेल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही भाजपकडून साताऱ्यावर दावा केला जात आहे.  

युतीच्या जागा वाटपात सातारा लोकसभेची जागा आतापर्यंत शिवसेनेकडेच राहिली आहे. 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शिवसेनेतून पुरूषोत्तम जाधव निवडणुक लढले होते. त्यावेळी त्यांनी 2,35,068 मते मिळविली होती. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात पुरूषोत्तम जाधव यांनी अपक्ष निवडणुक लढून 1,55,937 मते मिळविली होती. त्यावेळी शिवसेनेने ही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडली होती. त्यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांना 71 हजार 808 मते मिळाली होती.  

हा सर्व इतिहास पाहता, यावेळेस पुन्हा एकदा साताऱ्याची जागा शिवसेनेला मिळाली आहे. पण आता पुरूषोत्तम जाधव भाजपमध्ये आहेत. ही जागा भाजपच्या वाटेला येईल व तेथून तिकिट मिळेल या आशेवर पुरूषोत्तम जाधव आहेत. पण आता पुन्हा शिवसेनेला ही जागा गेल्याने येथून उमेदवार कोण असेल याची उत्सुकता आहे. 

सध्या शिवसेनेकडे उदयनराजेंना टक्कर देईल, असा उमेदवार नाही.नितीन बानुगडे पाटील यांच्याकडे पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी असल्याने ते उमेदवारीसाठी तयार नाहीत. त्यामुळे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे कोणाच्या नावाची घोषणा करणार याकडे जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. सातारा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतरही भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्ह्यातील नेत्यांनी मात्र, साताऱ्यावर आमचाच दावा आहे. येत्या एक दोन दिवसांत याचे चित्र स्पष्ट होईल, असे सांगू लागले आहेत. त्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. आता शिवसेनेच्या ताब्यातून ही जागा काढून घेऊन ते कोणाला उमेदवारी देणार हेही तितकेच महत्वाचे आहे. भाजपमधून जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व पुरूषोत्तम जाधव यांची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com