BJP Corporators Boycott Election in Karad | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

सभापती निवडीच्या विशेष सभेवरही भाजप नगरसेवकांचा बहिष्कार 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 1 जानेवारी 2019

पालिकेच्या विविध विषय सममितीच्या सभापती पदाच्या आज निवडी होणार होत्या. त्यापूर्वसंध्येला काल (सोमवारी) पालिकेची विशेष सभा झाली. त्यात स्वच्छ सर्वेक्षणचे विषय होते. त्या सभेवर भाजपच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता. त्यानंतर आज विविध विषय समितीच्या सभापतीपदाच्या निवडी होत्या. त्यावेळी भाजपचे नगरसेवक उपस्थित राहितील, असे वाटत असतानाच कालचीच भुमिका कायम ठेवत भाजपने आजही सभापती निवडीच्याच सभेवर बहिष्कार टाकला. 

कऱ्हाड :  कराड पालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीच्या विशेष सभेवर  भाजपने बहिष्कार कायम ठेवला. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांशिवाय विविध विषय समितीच्या सभापती निवडी पार पडल्या. त्यात बांधकाम समितीच्या सभापती पदावर हणमंत पवार यांना कायम ठेवल्याने त्यांची सलग दुसऱ्यादा वर्णी लागली आहे. माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांच्याकडे नियोजन समितीचे सभापतीपद आले आहे. अन्य समित्यांवर मात्र, नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. 

पालिकेच्या विविध विषय सममितीच्या सभापती पदाच्या आज निवडी होणार होत्या. त्यापूर्वसंध्येला काल (सोमवारी) पालिकेची विशेष सभा झाली. त्यात स्वच्छ सर्वेक्षणचे विषय होते. त्या सभेवर भाजपच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता. त्यानंतर आज विविध विषय समितीच्या सभापतीपदाच्या निवडी होत्या. त्यावेळी भाजपचे नगरसेवक उपस्थित राहितील, असे वाटत असतानाच कालचीच भुमिका कायम ठेवत भाजपने आजही सभापती निवडीच्याच सभेवर बहिष्कार टाकला. 

स्थायी समिती वगळता एकाही समितीत न जाण्याचा निर्णय घेत त्यांनी समितीच्या सदस्य पदासाठी एकाही अर्जही भरला नाही. स्थायीसाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची तेथे वर्णी लागली आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत पिठासिन अधिकारी तथा प्रांताधिकारी हिमत खराडे, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्याकडे अर्ज दाखल करायचे होते. त्या काळात दाखल झालेल्या अर्जानुसार दुपारी एक वाजता विशेष सभा झाली. त्यात निवडी जाहीर करण्यात आल्या. 

खराडे यांनी जाहीर केलेल्या निवडीनुसार बांधकाम सभापतीपदी हणमंत पवार यांची वर्णी लागली आहे. श्री. पवार यांच्याकडे ते पद होते. ते याहीवर्षी त्यानाच देण्यात आले आहे. आघाडीने एकमताने त्यांचे नाव दिले आहे. माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांच्याकडे नियोजन सभापतीपद देण्यात आले आहे. अन्य समित्यांवर नविन चेहरे देण्यात आले आहेत. त्यात पाणी पुरवठा सभापती पदावर सौ. अर्चना ढेकळे, आरोग्य सभापतीपदी गजेंद्र कांबळे, महिला व बालकल्याण समितीवर सौ. स्मिता हुलवान यांची निवड जाली आहे. विद्यमान आरोग्य सभापती सौ. प्रियांका यादव यांच्याककडे महिला व बालकल्याणचे उपसभापतीपद देण्यात आले आहे. 

स्थायी समितीच्या सदस्यपदावर जनशक्तीतर्फे राजेंद्र यादव व माजी नगराध्यक्षा श्रीमती शारदा जाधव यांची वर्मी लागली आहे. नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापती तर उपाध्यक्ष जयवंत पाटील शिक्षण समितीचे पदसिद्ध सभापती आहेत. निवड झालेल्या सभापतींचा प्रांताधिकारी खराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

संबंधित लेख