bjp corporator entry to shisena, mumbai | Sarkarnama

भाजप नगरसेविकेच्या  हातात धनुष्यबाण 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 1 जुलै 2017

मुंबई : मिरारोड येथील भाजपच्या नगरसेविका दीप्ती भट यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते.

मिरारोड येथील प्रभाग क्रमांक 20 मधून भाजपच्या तिकिटावर त्या निवडून आल्या होत्या. शिवसेनेच्या पक्षप्रवेशानंतर बोलताना त्या म्हणाल्या, की माझ्या विभागात अनेक समस्यांवर तोडगा काढून मी जनतेची सेवा केली. परंतु भाजपने मला म्हणावी तशी साथ दिली नाही. त्यामुळेच मी भाजपला रामराम करण्याचा निर्णय घेतला. शेवटी मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.  
 
संबंधित लेख