bjp corporator alligation on mla prashant bamb | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

आमदार प्रशांत बंब यांना धडा शिकवीन : दिनकर पाटील 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

नाशिक : येथील धरणांतून पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात महापालिकेच्या महासभेत सर्वच नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी भाजपचे सभागृह नेते दिनकर पाटील यांनी स्वपक्षाच्या आमदार प्रशांत बंब यांची चांगलीच खरडपट्टी काढली. अभ्यास न करता आरोप करणारे बंब यांना धडा शिकवू असा इशारा दिला. 

दिनकर पाटील म्हणाले, नाशिकच्या धरणांबाबत बंब नेहेमीच बेताल विधाने करतात. जाणीवपूर्वक वाद होईल असे बोलतात. त्यांचा काहीही अभ्यास नसतो. ते नाशिकला आले तर तर व्यवस्थित जातील का ? असा सवाल करतानाच त्यांनी बंब यांची प्रशंसाही केली. बंब यांच्यासारखे प्रतिनिधी आमच्या शहरात असते तर आम्हाला पाण्यावर चर्चा करावी लागली नसती. नाशिकचे आमदार निष्क्रिय असल्याचा आरोप पाटील यांनी केला.  

टॅग्स

संबंधित लेख