bjp central committi new delhi news | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

कार्यकारिणी बैठकीची  भाजपमध्ये लगीनघाई 

सकाळ न्यूज नेटवर्क 
रविवार, 24 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली ः राजधानीतील तालकटोरा मैदान सध्या नवलाख विजेच्या दीपांनी झळाळून गेले आहे. येथे सध्या लगीनघाई सुरू असून, दिल्लीतील भाजपचे नेते-कार्यकर्ते यांची अखंड वर्दळ येथे आहे. निमित्त आहे येत्या सोमवारी (ता. 25) होणाऱ्या भाजपच्या विस्तारित कार्यकारिणीच्या अंतिम टप्प्यातील तयारीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दिल्लीतील दूत खास लक्ष ठेवून आहेत. 

गुजरातसह आगामी विधानसभा नव्हे, तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीचाही पांचजन्य येथूनच फुंकला जाणार आहे. परिषदेच्या समारोपावेळी पंतप्रधान एखादी मोठी घोषणा करण्याचीही चिन्हे आहेत. 

देशभरातील बदलती हवा लक्षात घेऊन दिल्ली अधिवेशनाचे दरवाजे प्रसार माध्यमांसाठीही किलकिले करण्याचे ठरविण्यात आले आहे. मोदींच्या भाषणाचे थेट प्रसारणही केले जाऊ शकते. पंतप्रधान व वरिष्ठ मंत्र्यांची उपस्थिती लक्षात घेता सुरक्षा व्यवस्थेबाबत "पीएमओ'पासून साऱ्या यंत्रणा सजग झाल्या आहेत. तत्पूर्वी उद्या (ता.24) "एनडीएमसी' सभागृहात होणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचा अजेंडा अंतिम रूपात निश्‍चित केला जाईल. 

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त तालकटोरा मैदानावर होणाऱ्या या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपचे संसदेतील 340 खासदार, 14 मुख्यमंत्री, चार उपमुख्यमंत्री, सारे केंद्रीय मंत्री, 1387 आमदार, प्रदेशाध्यक्ष, संघटनमंत्री आदी उपस्थित राहणार आहेत असे दिल्लीचे प्रभारी श्‍याम जाजू यांनी सांगितले. जाजू यांच्यासह प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी व दिल्लीच्या इतर भाजप नेत्यांनी या मैदानावर जाऊन दिवसभर तयारीचा आढावा घेतला. 

शुद्ध शाकाहारी मेन्यू 
उपस्थितांसाठी जेवणाचा मेन्यू शुद्ध शाकाहारी असेल, असे सांगण्यात येते. पंतप्रधानांसह सारे नेते एकाच मंडपात भोजन घेतील. सध्या नवरात्र सुरू असल्याने मोदी व योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेते उपवास करत आहेत. त्यामुळे जेवणाच्या मंडपात उपवासाच्या नेत्यांसाठी वेगळा कक्ष असेल. त्यातही साधेच पदार्थ असतील, असे सांगितले जाते. 

संबंधित लेख