राष्ट्रवादीला मदत करण्यासाठी भाजपचा बारणेंना विरोध 

राष्ट्रवादीला मदत करण्यासाठी भाजपचा बारणेंना विरोध 

पिंपरी : राष्ट्रवादीच्या उमेदवाराला छुपी मदत करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी श्रीरंग बारणे यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी देऊ नये अशी मागणी काल केली असल्याचा पलटवार शहर शिवसेनेने आज केला. 

मागील लोकसभा निवडणुकीतील शल्य मनामध्ये ठेवून ही पत्रकबाजी करण्यात आली असून त्यामागील बोलविता धनी ठाऊक आहे, असा हल्लाबोल करणाऱ्या शिवसेनेचा रोख हा भाजपचे शहर कारभारी आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या दिशेने होता. 

तीन महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीत मावळमधून बारणे यांना उमेदवारी दिली, तर भाजप कार्यकर्ते त्यांचे काम करणार नाहीत,. त्यामुळे त्यांचा पराभव होईल,असा लेटरबॉम्ब सात भाजप नगरसेवकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढे फोडला होता. त्याला शिवसेनेने पत्रक काढून लगेच उत्तर दिले.दरम्यान, युती झाली आणि बारणे हेच उमेदवार राहिले, तर भाजपकडून त्यांना मनापासून मदत होईल का हा प्रश्न यातून उभा राहिला आहे. 

बारणेंच्या लोकप्रियतेने भाजपचे नेते हवालदिल झाले आहेत,अशी टीका शिवसेना पदाधिकार्यांनी केली आहे. ते म्हणतात. मावळमध्ये बारणेंनी मोठ्या प्रमाणात विकास काम केली आहेत. मतदार संघात त्यांचा दांडगा लोकसंपर्क आहे. सर्वसामान्यांशी समरस होणारा खासदार अशी त्यांची ख्याती आहे. त्यांच्या या लोकप्रियतेने हवालदिल झालेल्या भाजप नेत्यानेच नगरसवेकांना ढाल केले आहे. 

लोकसभेला युती होईल किंवा नाही ते अजून स्पष्ट झालेले नाही. युती झाली, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस किंवा शिवसेना असे दोनच पर्याय मतदारांसमोर राहणार आहेत.राष्ट्रवादीतून भाजपवाशी झालेल्यांना युती झाल्यास पुन्हा पूर्वश्रामीच्या पक्षावर निष्ठा दाखवायची आहे. त्यातूनच हे पत्रक काढण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार बारणे यांची उमेदवारी निच्छित केली आहे. त्यांनी संपूर्ण मतदार संघ ढवळून काढला आहे. युती होवो अथवा न हो 2019 च्या निवडणुकीत बारणे हेच शिवसेनेचे खासदार असणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com