bjp and sena will fight election together : Patil | Sarkarnama

भाजप-शिवसेना एकत्रित निवडणुका लढणार : चंद्रकांत पाटील 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 30 सप्टेंबर 2018

खटाव : ""जिहे- कटापूर योजनेला आता यापुढे स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार जलसंयोजना असे संबोधण्यात येईल. राज्यात शासनाने विविध योजना सक्षमपणे मार्गी लावल्या आहेत. त्यामुळे विरोधकांची पळापळ सुरू झाली आहे. शिवसेना व भाजप आगामी निवडणुका एकत्रच लढणार आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीत हिंमत असेल, तर वेगवेगळे लढून दाखवावे,'' असे आव्हान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. 

खटाव (जि. सातारा) येथे लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शेतकरी मेळाव्यात पाटील बोलत होते. या वेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील, सहकार परिषद अध्यक्ष शेखर चरेगावकर, सदाशिव खाडे, माजी आमदार दिलीप येळगावकर, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अनिल देसाई उपस्थित होते. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, जिहे-कटापूर हा रखडलेला प्रकल्प एका वर्षात मार्गी लागणार आहे. महाराष्ट्रातील 26 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने भरघोस निधी दिला आहे, तर महाराष्ट्र शासनाने 34 हजार कोटींची कर्जमाफी दिली असून, 45 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. पाणी, रस्ते व पीकविमा या मूलभूत गरजा व योजना मार्गी लागल्याने विरोधक धास्तावले आहेत. शिवसेना व भाजप आगामी काळात एकत्रच लढणार आहेत.'' 

मंत्री गिरीश महाजन म्हणाले, ""जिहे-कटापूर योजना युतीच्या काळात मंजूर झाली. कामही मार्गी लागत होते. पण, सत्ता गेली. 15 वर्षांत आघाडी सरकारने या योजनेची वाट लावली. सरकार लोकांसाठी काम करत आहे. जिहे-कटापूर योजना एका वर्षात युती शासनच पूर्ण करणार आहे. शासनाने 150 कोटी निधी दिला आहे, तर 450 कोटी निधी मिळणार आहे. त्यामुळे 50 टीएमसी पाणी या दुष्काळी भागाला मिळणार आहे.

संबंधित लेख