bjp and rammandir | Sarkarnama

विहिंपच्या हुंकार सभेच्या निमित्ताने भाजपचे शक्ती प्रदर्शन

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 डिसेंबर 2018

औरंगाबाद : राम मंदिरासाठी संसदेत कायदा करा या मागणीसाठी विश्‍व हिंदू परिषदेची हुंकार सभा औरंगाबादेत काही तासातच सुरू होणार आहे. विहिंपचे उपाध्यक्ष हुकूमचंद सावला हे या हुंकार सभेला संबोधित करणार आहेत. "हुंकार' च्या निमित्ताने औरंगाबादेत भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी चालवली आहे. संत तुकाराम नाट्यगृहात सायंकाळी होणाऱ्या हुंकार सभेचा प्रचार आणि वातावरण निर्मितीसाठी भव्य वाहन रॅली काढत भाजपने शिवसेनेला जशास तसे उत्तर देण्याची तयारी चालवली आहे. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी 25 नोव्हेंबर रोजी आयोध्येत जाऊन राम मंदिराचा नारा दिला. सत्तेवर येताच राम मंदिर बांधू हे सत्तेवर येण्यापुर्वी दिलेले आश्‍वासन म्हणजे मोदी सरकारचा जुमला होता का? असा तिखट सवाल उध्दव ठाकरे यांनी आयोध्येत जाऊन विचारला होता. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचा मुद्दा हायजॅक करत भाजपची कोंडी करण्यात शिवसेना यशस्वी ठरल्याची चर्चा होत असतांनाच आता विश्‍व हिंदू परिषदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने देखील " मंदिर वही बनायेंगेची' आरोळी ठोकली आहे. 

विश्‍व हिंदू परिषदेचे पुर्व अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी काही महिन्यापुर्वीच राम मंदिरामचा मुद्दा मोदी सरकारने बाजूला ठेवल्याचा आरोप करत मोदी सरकारवर तोफ डागली होती. एवढेच नाहीतर अध्यक्षपद सोडत त्यांनी राम मंदिरासाठी स्वतंत्रपणे मोहिम सुरू केली. त्यांच्या पश्‍चात विहिंपचे उपाध्यक्ष हुकूमचंद सावला यांनी आता आयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा करा अशी भूमिका घेत "हुंकार' दिला आहे. त्यासाठी सर्वपक्षीय खासदारांना भेटून राम मंदिरासाठी कायदा करण्याची मागणी संसदेत लावून धरा असा आग्रह देखील त्यांनी केला आहे. 

भाजपने घेतली जबाबदारी.. 
विश्‍व हिंदू परिषदेची औरंगाबादेतील हुंकार सभा यशस्वी करण्याची जबाबदारी भाजपने आपल्या खांद्यावर घेतली आहे. आमदार अतुल सावे, शहर-जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह भाजपचे सगळेच पदाधिकारी, आणि कार्यकर्ते हुंकार सभेच्या नियोजनात गुंतले आहेत. कुठल्याही परिस्थीतीत हुंकार सभा यशस्वी करायचीच यासाठी भाजपचे पदाधिकारी मेहनत घेतांना दिसत आहेत. 

सोशल मिडियाचा आधार घेत फेसबुक, व्हॉटसऍप, ट्‌ववीटरच्या माध्यमातून आजच्या हुंकार सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आणि शहरात जागोजागी पोस्टर लावण्यात आले आहे. हुंकार सभेच्या निमित्ताने शिवसेनेच्या बालेकिल्यात शक्ती प्रदर्शन करण्याची चालून आलेली संधी भाजप दवडवू इच्छित नाही. त्यासाठीच मोठ्या संख्येने वाहन रॅली काढून भाजपचे पदाधिकारी हुंकार सभेच्या ठिकाणी दाखल होणार आहेत. 

संबंधित लेख