bjp and munda palika | Sarkarnama

मौदा नगराध्यक्षपदी भाजपच्या भारती सोमनाथे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 डिसेंबर 2018

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मौदा नगराध्यक्षपदी भारती सोमनाथे केवळ 128 मतांनी निवडून आल्या. त्यांनी कॉंग्रेसच्या रोशनी निनावे यांचा पराभव केला. मौदा नगरपालिका पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघात येते. त्यामुळे या नगरपरिषदेची निवडणूक बावनकुळे यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. या निवडणुकीसाठी कॉंग्रेसनेही जोरदार तयारी केली होती. परंतु कॉंग्रेसच्या रोशनी निनावे यांना केवळ 128 मतांनी पराभव पचवावा लागला. 

एकूण 17 सदस्य असलेल्या या नगरपालिकेत भाजपचे 8 सदस्य निवडून आले आहेत. कॉंग्रेसचे 5 व 2 अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत. नागपूर जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक व आमदार सुनील केदार यांनी या निवडणुकीत एकत्रितपणे प्रचार केला परंतु पालकमंत्री बावनकुळे यांनी या दोन्ही नेत्यांची डाळ शिजू दिली नाही. कॉंग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीचा फटका कॉंग्रेसला बसला. कॉंग्रेसच्या दोन उमेदवारांनी बंडखोरी केली होती. या बंडखोरीमुळे भाजपच्या पारड्यात ही नगरपालिका गेल्याचे बोलले जात आहे. 

या नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे देवेंद्र गोडबोले यांनी पालकमंत्री बावनकुळे यांच्या विरोधात आघाडी उघडली होती. परंतु शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. शिवसेनेचे पालिकेत केवळ 2 सदस्य निवडून आले आहेत. 

संबंधित लेख