अकोला जिल्ह्यात सरपंच पदावर भाजपचेच वर्चस्व !

कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या ताब्यातील ग्रामपंचायतीवर पकड कायम ठेवल्याचे दिसून आले. निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर आता 272 पैकी 145 सरपंच भाजपचे विजयी झाल्याचा दावा जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी केला आहे.
  अकोला जिल्ह्यात सरपंच पदावर भाजपचेच वर्चस्व !

अकोला : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा राजमार्ग असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्ह्यातील 272 ग्रामपंचायतीच्या आज जाहीर झालेल्या निकालात सरपंच पदावर भाजपचे 145 उमेदवार विजयी झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत जिल्हा परिषदेत सत्ताधारी असलेला भारिप-बमसं दुसऱ्या क्रमांकावर आला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थेत महत्वपूर्ण भुमिका बजावणाऱ्या ग्रामपंचायतींची निवडणूक नेहमीच अती-तटीची होत असते. जिल्हा परिषद, पंचायत समितीवर सत्ता स्थापनेसाठी स्थानिक ग्रामपंचायत ताब्यात घेण्याची रणनिती सर्वच राजकीय पक्षांची असते. जिल्ह्यात 272 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या, आज त्याचे निकाल जाहीर करण्यात आले. यावर्षीपासून सरपंच पदाची निवड ही थेट जनतेमधून असल्याने सरपंच पदासाठी उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच झाली होती. 

ही निवडणुक जिल्हा परिषदेच्या सत्तेचा राजमार्ग असल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिष पिंपळे, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांच्यासह तालुकास्तरावरील पदाधिकाऱ्यांनी अगदी गावपातळीवर मोर्चेबांधणी करत जास्तीत जास्त सरपंच निवडणून आणण्याची रणनिती आखली होती. तर जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भारिप-बमसंने सुद्धा मोर्चेबांधणी करत आपला गड कायम राखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. शिवसेनेत नेतृत्व बदल झाल्यावर जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी पातूर, बाळापूरसह इतर तालुक्‍यात जोर लावला. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या ताब्यातील ग्रामपंचायतीवर पकड कायम ठेवल्याचे दिसून आले. निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर आता 272 पैकी 145 सरपंच भाजपचे विजयी झाल्याचा दावा जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी केला आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षनिहाय झाली नसली तरी भाजप, भारिप-बमसं, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आपल्याच पक्षाचे सर्वांधीक सरपंच विजयी झाल्याचे दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com