bjp activist | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण : मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

भाजप कार्यकर्ते ठोकणार गावोगावी मुक्‍काम! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 एप्रिल 2017

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचे हे संपर्क अभियान यशस्वी झाल्यास आगामी निवडणुकीसाठी त्याचा फायदा भाजपच्या उमेदवारांना होणार आहे. सध्या भारतीय
जनता पक्षाने प्रत्येक निवडणुकीत आपले उमेदवार व पॅनेल उभे करण्याची भूमिका ठेवली आहे. 

सातारा : केंद्र व राज्य शासनाने सर्वसामान्यांसाठी गेल्या अडीच वर्षात आणलेल्या विविध योजनांची माहिती गावागावात पोचविण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे 
कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. जिल्ह्यातील 530 प्रशिक्षित कार्यकर्ते त्यासाठी 25 मे ते 10 जून या कालावधीत गणनिहाय गावागावात मुक्काम ठोकणार आहेत. 

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत सरकारने सर्वसामान्य माणसांसाठी काही
महत्त्वपूर्ण योजना आणल्या आहेत. या योजनांची माहिती प्रत्येक गावांतील प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोचणे आवश्‍यक आहे. तसेच या योजनांचा लाभ कसा घेता येईल, याची
जाणीव व जागृती करण्याकडे भारतीय जनता पक्षाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यात पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जनधन
योजना, शेती विमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, सुकन्या समृद्धी योजना, आदींचा समावेश आहे. 

या योजनांबाबत जागृती करून त्यांचा लाभ जास्तीत लोकांना कसा मिळवून देता येईल, यावर भर देणार आहेत. यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रत्येक तालुक्‍यातील
कार्यकर्त्यांची निवड करून त्यांची टीम बनविली आहे. जिल्ह्यातील 530 कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. येत्या 25 मे ते 10 जून या कालावधीत हे प्रशिक्षित
कार्यकर्ते गणनिहाय प्रत्येक गावांत विखुरले जातील. गावात मुक्कामी राहून प्रत्येक व्यक्तीला शासकीय योजना काय आहेत. त्यांची अंमलबजावणी कशी होते. त्याचे
लाभार्थी होण्याचे निकष व त्याचा लाभ कसा घ्यायचा ही सर्व माहिती दिली जाणार आहे. 

 

संबंधित लेख