आजचा वाढदिवस : विनोद तावडे, शिक्षणमंत्री.

आजचा वाढदिवस : विनोद तावडे, शिक्षणमंत्री.

बोरिवली विधानसभा मतदारसंघातून ते 2014 मध्ये आमदार म्हणून निवडून आले आहेत. राज्यातील भाजपच्या वजनदार व प्रमुख नेत्यापैकी एक आहेत. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून काम केले आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष, अखिल भारतीय राष्ट्रीय कार्यकारी परिषदेचे सदस्य आणि भाजपचे समन्वय समितीचे ते प्रमुख सदस्य होते. 1995 मध्ये त्यांची भाजपचे महाराष्ट्र सरचिटणीस म्हणून निवड झाली होती त्यांची निवड 1999 पर्यंत होती. 2002 मध्येही त्यांच्यावर पुन्हा ही जबाबदारी सोपवण्यात आली. विधानपरिषदेत ते विरोधी पक्षाचे नेते होते. शिक्षणमंत्री म्हणून शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचे व दूरगामी बदल करण्याचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com