birthday of vinay kore | Sarkarnama

आजचा वाढदिवस : विनय कोरे, माजी मंत्री, जनसुराज्य पक्ष संस्थापक अध्यक्ष.

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

महाराष्ट्रासह देशात आणि आशिया खंडात नावाजलेल्या वारणा उद्योग समूहाचे नेतृत्व, राज्याचे माजी अपारंपरिक ऊर्जामंत्री विनय कोरे करत आहेत. अत्यंत कमी वेळात विनय कोरे यांनी राजकारणात मोठी झेप घेतली. जनसुराज्यशक्ती हा नवा पक्ष स्थापन करून त्यांनी एकेकाळी पाच आमदार निवडून आणले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आपोआपच कोरे यांचा दबदबा निर्माण झाला. राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळेच त्यांचे भाजप असो की शिवसेना, कॉंग्रेस असो की राष्ट्रवादी या सर्व पक्षात त्यांचे मित्र आहेत. जिल्हा बॅंक व जिल्हा परिषद या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात चांगल्या पद्धतीने विकासकामे केली आहेत.

महाराष्ट्रासह देशात आणि आशिया खंडात नावाजलेल्या वारणा उद्योग समूहाचे नेतृत्व, राज्याचे माजी अपारंपरिक ऊर्जामंत्री विनय कोरे करत आहेत. अत्यंत कमी वेळात विनय कोरे यांनी राजकारणात मोठी झेप घेतली. जनसुराज्यशक्ती हा नवा पक्ष स्थापन करून त्यांनी एकेकाळी पाच आमदार निवडून आणले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आपोआपच कोरे यांचा दबदबा निर्माण झाला. राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळेच त्यांचे भाजप असो की शिवसेना, कॉंग्रेस असो की राष्ट्रवादी या सर्व पक्षात त्यांचे मित्र आहेत. जिल्हा बॅंक व जिल्हा परिषद या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात चांगल्या पद्धतीने विकासकामे केली आहेत. पन्हाळा शाहूवाडी मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढण्याची जय्यत तयारी त्यांनी सुरू केली आहे. 

संबंधित लेख