birthday of vijaysingh mohite patil | Sarkarnama

आजचा वाढदिवस : विजयसिंह मोहिते-पाटील - खासदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस, माढा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 12 जून 2018

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचा आज वाढदिवस. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाला आजपासून सुरवात झाली आहे. अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने खासदार मोहिते-पाटील जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होऊ लागले आहेत. 2009 मधील विधानसभा निवडणुकीत आमदार भारत भालके यांनी त्यांचा पराभव केला. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वारू रोखण्यात श्री. मोहिते-पाटील यशस्वी झाले होते. मोहिते-पाटील यांच्या विजयाने राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिलासा मिळाला होता. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या शब्दाला मान आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचा आज वाढदिवस. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाला आजपासून सुरवात झाली आहे. अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने खासदार मोहिते-पाटील जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होऊ लागले आहेत. 2009 मधील विधानसभा निवडणुकीत आमदार भारत भालके यांनी त्यांचा पराभव केला. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वारू रोखण्यात श्री. मोहिते-पाटील यशस्वी झाले होते. मोहिते-पाटील यांच्या विजयाने राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिलासा मिळाला होता. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या शब्दाला मान आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सहकारी साखर कारखाने, शैक्षणिक संस्थांमध्येही त्यांचे भरीव काम आहे. खासदारकीच्या काळात त्यांनी रस्ते, पासपोर्ट कार्यालय, रेल्वेचे विषय प्राधान्याने हाताळले आहेत. 
 

संबंधित लेख