Birthday Vijaya Rahatkar | Sarkarnama

आजचा वाढदिवस : विजया रहाटकर, अध्यक्ष राज्य महिला आयोग, राष्ट्रीय अध्यक्ष भाजप महिला मोर्चा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

 विजया रहाटकर, अध्यक्ष राज्य महिला आयोग, राष्ट्रीय अध्यक्ष भाजप महिला मोर्चा

वाढदिवस : ता. दिनांक 21 ऑगस्ट

औरंगाबाद : भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया किशोर रहाटकर यांचा आज वाढदिवस. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण नाशिकमध्ये पुर्ण केल्यानंतर त्या विवाहबध्द होऊन औरंगाबादेत स्थायिक झाल्या. 1995 मध्ये सर्वप्रथम त्यांनी भाजपकडून औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लढवली आणि राजकारणात प्रवेश केला.

पहिल्याच निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर त्या 2000 व 2005 अशी दोन टर्म नगरसेवक राहिल्या. 2007 मध्ये भाजपच्या महापौर म्हणून त्यांनी शहराचा कारभार पाहिला. युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र महापौर परिषदेच्या अध्यक्ष या शिवाय विविध समित्यांवर सदस्य म्हणून त्यांना काम केले. 2009 मध्ये श्रीमती रहाटकर यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सहचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली होती.

महिला मोर्चाच्याच्या सहचिटणी म्हणून काम करत असतांना पक्षाने त्यांना बढती देत महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. केंद्रीय नेतृत्वाने श्रीमती रहाटकर यांच्यावर विश्‍वास दाखवल्यानंतर त्यांच्याकडे आणखी एक महत्वाची जबादारी सोपवण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीमती रहाटकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून नेमणूक केली.

संबंधित लेख