birthday of vandana chavan | Sarkarnama

आजचा वाढदिवस : वंदना चव्हाण, खासदार राष्ट्रवादी कॉंग्रेस

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 6 जुलै 2018

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण यांचा आज वाढदिवस. व्यवसायाने वकील असलेल्या वंदना चव्हाण यांनी राजकारणात उडी घेतली आणि पहिल्या प्रयत्नात त्या पुणे महापालिकेत नगरसेविका झाल्या. पुण्याच्या महापौर झाल्या. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश. विधान परिषदेवर आमदार व सलग दोनवेळा राज्यसभेच्या खासदार अशी चढती राजकीय कमान असलेल्या वंदना चव्हाण गेली नऊ वर्षे शहर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष आहेत. 

स्वच्छ प्रतिमा व सर्व प्रकारच्या वादापासून दूर राहिलेल्या चव्हाण यांची राज्यसभेवर दुसऱ्यांदा नुकतीच निवड झाली आहे. खासदार चव्हाण यांचे वडील विजयराव मोहिते हे नावाजलेले वकील होते. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे वकिलीची प्रॅक्‍टीस सुरू केली होती. मात्र कॉंग्रेसच्या पक्षाच्या त्या काळच्या नेत्यांनी केलेल्या आग्रहाखातर महापालिका निवणुकीसाठी त्या उभ्या राहिल्या पहिल्याच प्रयत्नात त्या नगरसेवक झाल्या. त्यानंतर पुन्हा निवडून येऊन पुण्याच्या महापौर झाल्या. महापौरपदाच्या काळातील त्यांचे काम उत्तम होते. कालांतराने त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आल्या. राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी मिळाली. त्यानंतर पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. गेली नऊ वर्षे त्या शहराध्यक्ष आहेत. दरम्यान, राज्यसभेवर पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिल्याने नुकत्यात त्या दुसऱ्यांदा खासदार झाल्या आहेत. 

संबंधित लेख