birthday of sushilkumar shinde | Sarkarnama

आजचा वाढदिवस : सुशीलकुमार शिंदे - माजी केंद्रीय गृहमंत्री.

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

रात्रशाळेत शिकणारा सोलापुरातील एक विद्यार्थी, जिल्हा न्यायालयातील शिपाई ते केंद्रीय गृहमंत्री व लोकसभेतील पक्षनेता अशी वाटचाल करतो. सुशीलकुमार शिंदे यांची ही वाटचाल सर्वांनाच अभिमानास्पद आहे. आज (मंगळवार) त्यांचा 78 वा वाढदिवस. सत्तेवर नसतानाही वडीलकीच्या नात्याने ते सोलापूरसंदर्भातील प्रत्येक घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीचा 1974 ते 2014 हा प्रदीर्घ कालखंड आहे. या 40 वर्षांत सोलापूरचा विकास व नागरीकरणाच्या प्रक्रियेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

रात्रशाळेत शिकणारा सोलापुरातील एक विद्यार्थी, जिल्हा न्यायालयातील शिपाई ते केंद्रीय गृहमंत्री व लोकसभेतील पक्षनेता अशी वाटचाल करतो. सुशीलकुमार शिंदे यांची ही वाटचाल सर्वांनाच अभिमानास्पद आहे. आज (मंगळवार) त्यांचा 78 वा वाढदिवस. सत्तेवर नसतानाही वडीलकीच्या नात्याने ते सोलापूरसंदर्भातील प्रत्येक घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीचा 1974 ते 2014 हा प्रदीर्घ कालखंड आहे. या 40 वर्षांत सोलापूरचा विकास व नागरीकरणाच्या प्रक्रियेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. होटगी रोड विमानतळ, सहापदरी रस्त्यांची योजना, बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाची योजना, सोलापूरला जोडणाऱ्या नव्या रेल्वे गाड्या सुरू करणे हे शिंदे यांच्यामुळे शक्‍य झाले. महाराष्ट्राचे मंत्री असताना त्यांनी सोलापूरच्या प्रश्‍नांकडे लक्ष घालून, मूलभूत सेवा आणि योजना राबविल्या. सोलापूरसाठी स्वतंत्र विद्यापीठ त्यांच्या प्रयत्नांमुळे शक्‍य झाले. जिल्हा विद्यापीठ ही अभिनव संकल्पना त्यांचीच. सूतगिरणी, साखर कारखाने, सहकारी सोसायट्या, शिक्षण संस्थांचे जाळे यावर त्यांचे नेतृत्व उभे नसून, लोकांच्या प्रेमावर आणि जनतेसाठी त्यांनी केलेल्या कामावर उभे आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी असताना दोन वेळेस त्यांना प्रचंड मताधिक्‍यांनी विजयी करून सोलापूरकरांनी त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केले. हुतात्मा इंटरसिटी आणि सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेसच्या जोडीला इंद्रायणी आणि मुंबई एक्‍स्प्रेस, पॉवर ग्रीड आणि एनटीपीसी प्रकल्प सुरू केले. शासकीय रुग्णालयात भारत निर्माण योजनेतून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर करून घेतले. 

 

संबंधित लेख