birthday of suresh gore | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

आजचा वाढदिवस : सुरेश गोरे, आमदार (खेड, जि. पुणे)

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

शिवसेनेकडून 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी माजी आमदार दिलीप मोहिते यांच्याशी लढत देऊन विजय मिळविला. आमदार गोरे यांचा प्रवास जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असा राहिला. राजकारणात त्यांनी चाकण विकास सोसायटीच्या माध्यमातून पदार्पण केले. सोसायटीचे संचालक, चेअरमन आदीही जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. तालुक्‍यात विविध विकासकामे त्यांनी केली आहेत. शेतकऱ्यांचे, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे, पिण्याच्या पाण्याचे, वाहतुकीचे आदी प्रश्न सोडविण्यासाठी ते सक्रिय आहेत. भामा-आसखेड धरणग्रस्तांचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्याचा ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत.

शिवसेनेकडून 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी माजी आमदार दिलीप मोहिते यांच्याशी लढत देऊन विजय मिळविला. आमदार गोरे यांचा प्रवास जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असा राहिला. राजकारणात त्यांनी चाकण विकास सोसायटीच्या माध्यमातून पदार्पण केले. सोसायटीचे संचालक, चेअरमन आदीही जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. तालुक्‍यात विविध विकासकामे त्यांनी केली आहेत. शेतकऱ्यांचे, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे, पिण्याच्या पाण्याचे, वाहतुकीचे आदी प्रश्न सोडविण्यासाठी ते सक्रिय आहेत. भामा-आसखेड धरणग्रस्तांचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्याचा ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत. तालुक्‍यात दुसऱ्यांदा आमदार होण्यासाठी त्यांची तयारी जोमाने चालू आहे. 

संबंधित लेख